बोठे विरोधात 560 पानांचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 8, 2021

बोठे विरोधात 560 पानांचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल.

 बोठे विरोधात 560 पानांचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल.

रेखा जरे हत्याकांड प्रकरण.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः रेखा हजारे हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी बाळ बोठे विरोधात 560 पानी दोषारोपपत्र डीवायएसपी तपासी अधिकारी अजित पाटील यांनी आज पारनेर न्यायालयात दाखल केले आहे या दोषारोप पत्रात साक्षीदारांचे जबाब असून काही अपूर्ण जवाब पुरवणी दोषारोप पत्र दाखल केले जाणार आहेत.
आज दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रात बोठे हा मुख्य आरोपी आहे. घटना घडल्यानंतर सुरुवातीला तो तीन महिने फरार झाला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पाच पथके त्याच्या शोधासाठी पाठविली होती. त्याचा शोध घेत असताना तो हैदराबाद येथे असल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलिसांनी हैदराबाद मधून बोठेला अटक केली होती. या घटनेमध्ये एक महिला आरोपी असून, तिचा अद्यापपर्यंत ठावठिकाणा लागलेला नाही. या प्रकरणांमध्ये आतापर्यंत 11 आरोपींचा समावेश करण्यात आलेला आहे. बोठेला अटक झाल्यानंतर त्याने पोलिस तपासामध्ये विविध माहिती पोलिसांना दिली आहे. ज्या वेळेला घटना घडली तेव्हा तो फरार झाला होता.
बाळ बोठे याने पहिले दहा दिवस नगरच्या रेल्वे स्थानकावर मुक्काम केल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच एका पोलिसाच्या मोबाईलवरुन त्याने काही जणांशी संपर्क केल्याची माहिती ही पोलिसांकडून देण्यात आली आहे . त्यामुळे रेल्वे पोलिसांना पत्र लिहून याची माहिती तपासी अधिकार्‍यांनी मागवली होती. ती अद्यापर्यंत मिळू  शकलेली नाही. त्यामुळे काहीचे जबाब होऊ शकलेले नाहीत. बोठे याला अटक केल्यानंतर त्याच्या संदर्भामध्ये आता पुरवणी दोषारोपपत्र न्यायालयामध्ये दाखल केले जाणार आहे.

No comments:

Post a Comment