आशा सेविका, कोरोना योद्धे यांना 5000 रु. मानधन मिळावे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, June 8, 2021

आशा सेविका, कोरोना योद्धे यांना 5000 रु. मानधन मिळावे

 आशा सेविका, कोरोना योद्धे यांना 5000 रु. मानधन मिळावे

शिव राष्ट्रसेनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शिव राष्ट्रसेनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले असुन  शिव राष्ट्रसेना पक्षाच्या कामगार जिल्हाध्यक्ष सौ हेमलता घोरपडे यांनी निवेदनात सांगितले की, आज कोरोना -19 या महामारीत समाजातील काही घटक देवदूत बनवुन आशा सेविका व वार्डबॉय यांच्या रुपाने जनतेच्या घरात जाऊन पॉझिटिव रूग्णांची सेवा करतात व आपला जीव धोक्यात घालवून कोरोना काळात आशा ताई सेवा देतात. तरी हे बेफिकीर प्रशासन इतर गोष्टींची कोटी रूपयांची उधळपट्टी करत असताना. आशा ताईंना फक्त 1000 रू मानधन देते. हे एक मोठे नगरकरांचे दुरदयव म्हणावे लागेल. यात आशा सेविकांना 5000 मानधन मिळावे ही शिव राष्ट्र सेना पक्षाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.
तसेच शिव राष्ट्र सेना पक्षाचे पक्षाध्यक श्री संतोष नवसुपे यांनी सांगितले की् एकी कडे आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेबांचा महाराष्ट्र  राज्यासाठीआदेश असताना आशा ताईंना मानधनात डबल वाढ देण्यात यावी तसेच जिल्हा परिषदेच्या आशा ताईंना सात ते आठ हजार रुपये मानधन भेटत असताना मनपा च्या आशा ताईंना 1000 रु कस ?या गोष्टींचे विशेष वाटत आहे या शिवाय आपल्या कामाचा मोबदला मागण्यासाठी अधिकार्‍यांच्या दालना बाहेर या माता भगिनींना तासंतास उभे राहवे लागते. या विरोधात मनपा आयुक्त श्री शंकर गोरे साहेब यांनी लक्ष घालून योग्य न्याय आशा ताईंला दयावा ही शिव राष्ट्र सेना पक्षाच्या वतीने मागणी करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here