बूथ हॉस्पिटलमधील परिचारिकांना, कोरोनाग्रस्तांना व गरजू नागरिकांना 400 किराणा किटचे वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, June 15, 2021

बूथ हॉस्पिटलमधील परिचारिकांना, कोरोनाग्रस्तांना व गरजू नागरिकांना 400 किराणा किटचे वाटप

 बूथ हॉस्पिटलमधील परिचारिकांना, कोरोनाग्रस्तांना व गरजू नागरिकांना 400 किराणा किटचे वाटप


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः कोरोनाच्या महाभयंकर संकटामध्ये काही नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत,लॉकडाऊन मुळे काही नागरिकांचा रोजगार बंद होता तर काहींचे हाताचे काम गेले त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती आर्किटेक्ट इंजिनिअर ड सर्व्हेअर्स असोसिएशनने वर्षानुवर्ष सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासन्याचे काम करत आहे.यावर्षी महाभयंकर कोरोना संकट काळामध्ये सभासद व शहरातील दानशूरांनी पुढे येऊन ऐसा मिशन राहत अंतर्गत गरजूंना व कोरोना रुग्णांची सेवा करणार्‍या परिचारिकांना 15 दिवस पुरेल एवढ्या किराणा किटचे वाटप केले निंबळक येथील कोविड सेंटर,बाजार समितीचे वाळुंज येथील कोविड सेंटर,रोटरी कोविड सेंटर,बूथ हॉस्पिटल मधील नर्सिंग स्टाफ व शिपाई तसेच गरजू रुग्ण व बेरोजगार गरजू कुटुंबीयांना या किटचे वाटप केले बूथ हॉस्पिटल नगरकारणांसाठी एक वरदान ठरले  असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष सलीम शेख यांनी केले.
आर्किटेक्ट इंजिनिअर ड सर्व्हेअर्स असोसिएशनच्या वतीने ऐसा मिशन राहत अंतर्गत बूथ हॉस्पिटल परिचारिकांना किराणा किट वाटप करण्यात आले यावेळी अध्यक्ष सलीम शेख,उपाध्यक्ष विजय कुमार पादिर, सचिव अजय अपूर्वा,अजित माने,जितेश सचदेव, प्रदीप तांदळे,किशोर बोरा,कैलास ढोरे,राहुल पांडव,अन्वर शेख,शोएब खान,अभिजित देवी,भगवान नगरे,नंदकिशोर घोडके,मनोज जाधव,प्रल्हाद जोशी,आबा कर्डिले, महेश आव्हाड,महेश संककेला,किरण टाकले,संदीप काकानी,इकबाल सय्यद आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अजित माने म्हणाले की,ऐसा मिशन राहत अंतर्गत उपक्रम 20 एप्रिल पासून चालू आहे. ऐसाने नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले आहे.बूथ हॉस्पिटलने गेल्या एक वर्ष पासून कोरोणच्या महाभयंकर संकटा मध्ये अनेक रुग्णांनावर यशस्वी उपचार करू आनंदाने सुखरूप त्यांच्या घरी पाठवले आहे,हजारो रुग्णांवर बूथ हॉस्पिटलने मोफत उपचार केले त्यांच्या कामाचा गौरव संपूर्ण राज्यभर होत आहे बूथ हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी मेजर देवदान कळकुंबे यांच्यासह सर्व कर्मचार्‍यांनी आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा समजून काम केले,आरोग्य सेवेचे काम हे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयकुमार पादिर यांनी केले तर आभार प्रदर्शन अजय अपूर्वा यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here