मनपा हद्दीत फक्त 34 रुग्ण. जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 7, 2021

मनपा हद्दीत फक्त 34 रुग्ण. जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल.

 मनपा हद्दीत फक्त 34 रुग्ण.

जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आजपासून शहरातील लॉकडाऊन संपुष्टात आला असून जिल्ह्याची वाटचाल कोरोना मुक्तीच्या दिशेने सुरू असल्याचे दिसून येत आहे. चोवीस तासात जिल्ह्यात 530 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात फक्त 34 बाधितांची भर पडली आहे. सर्व तालुक्यांची आकडेवारी 70 च्या आत असल्याने जिल्हावाशियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मागील तीन महिण्यांपासून नगर जिल्ह्यची आकडेवारी झपाट्याने वाढत होती. याच दरम्यान जिल्ह्यातील शेकडो जणांचा कोरोनाने मृत्यू झाले. दरम्याने मागील चार-पाच दिवसापासून कोरोना बाधितांच्या आकडेवारीत घट होऊ लागल्याने दिलासा मिळत आहे. त्यातच आज अहमदनगर जिल्ह्यातील आकडेवारी 530 वर आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
आज सर्वाधिक रुग्ण संगमनेर तालुक्यात आढळले असून ती आकडेवारी 68 एवढी आहे. तर दुसर्या स्थानावर शेवगाव तालुका असून ही आकडेवार 66 वर आहे. तर कोपरगावची आकडेवारी एक अंकावर आली आहे. यामुळे नगरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज सोमवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 55, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 289 तर अँटीजेन चाचणीत 186 असे 530 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे- संगगमनेर 68, शेवगाव 66, पारनेर 58, नेवासा 49, जामखेड 41, पाथर्डी 37, श्रीगोंदा 36, नगर शहर 34, कर्जत 34, श्रीरामपूर 33, राहाता 18, राहुरी 18, नगर ग्रामीण 15, अकोले 13, कोपरगाव 05, इतर जिल्हा 04, भिंगार 01 असे कोरोना बाधित आढळले आहे.

No comments:

Post a Comment