राहुरी तालुक्यात 30 हजार हेक्टरवर खरिपाच्या पेरण्यांचे नियोजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 4, 2021

राहुरी तालुक्यात 30 हजार हेक्टरवर खरिपाच्या पेरण्यांचे नियोजन

 राहुरी तालुक्यात 30 हजार हेक्टरवर खरिपाच्या पेरण्यांचे नियोजन

नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः यंदाच्या वर्षी राहुरी तालुक्यात 30 हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्याांचे नियोजन कृषी विभागाकडून केले जात आहे . या वर्षी पावसाचे चांगले संकेत असल्याने कपाशी , बाजरी, मका आणि मुगाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे .
राहुरी तालुक्यातील पश्चिम भागातील 17 गावे खरिपाची मानली जातात. खरिपाचे 18 ते 20 हजार हेक्टर क्षेत्र असले तरी तालुक्यात अनेक ठिकाणी खरीप पिके घेतली जातात . यात प्रामुख्याने सोयाबीन , कापूस , भुईमूग , मका या पिकांचा समावेश आहे . सध्या राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागात पूर्वमशागतीची कामे सुरू आहेत . या वर्षी कृषी विभागाच्या अहवालानुसार एकूण 20 हजार 400 हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या यांचे उद्दिष्ट असून त्यात कापूस 11 हजार हेक्टर , बाजरी 9 हजार हेक्टरवर , सोयाबीन 4 हजार हेक्टर , मका 3 हजार 500 ,मूग 1 हजार 600 हेक्टर , भुईमूग 550 हेक्टर तर तुरीचे 250 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या होण्याची शक्यता आहे . कांदा , ऊस व चारा पिकांचे ही मुबलक प्रमाणावर पेरा झालेला आहे . मागील वर्षी 26 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्या याचे उद्दिष्ट कृषी विभागाकडून केले असताना चांगल्या पावसामुळे राहुरी तालुक्यात 29 हजार 200 हेक्टर क्षेत्रावर अर्थात 115 टक्के पेरण्या झाल्या होत्या . या वर्षीदेखील चांगल्या पावसाचे संकेत आहेत. हवामान विभागाने ही चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे .राहुरी तालुका कृषी विभागाने खरीप हंगामासाठी तयारी केली असून शेतकर्‍यांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे.

No comments:

Post a Comment