चक्का जाम आंदोलन ! 26 ला ओबीसी आरक्षणासाठी भाजपचं... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, June 24, 2021

चक्का जाम आंदोलन ! 26 ला ओबीसी आरक्षणासाठी भाजपचं...

 चक्का जाम आंदोलन ! 26 ला ओबीसी आरक्षणासाठी भाजपचं...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे या मागणी साठी भाजपच्या वतीने शनिवार दि. 26 रोजी सक्कर चौकात सकाळी अकरा वाजता चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. बाजार समिती  येथे अभय आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली व  मा. आ. शिवाजी कर्डीले याच्या मार्गदर्शनाखाली नगर शहरात आंदोलन चे नियोजन करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कर्डिले म्हणाले भाजप सरकारने हायकोर्टत मराठ आरक्षण टिकवून ठेवले माञ राज्य सरकारला आरक्षण टिकवून ठेवता आले नाही. सरकारला कायदयाचा अभ्यास नसल्यामुळे आरक्षण टिकवता आले नाही. या सरकारला मराठा आरक्षण द्यायचे नाही. ओबीसी समाजाला आरक्षण देण्यासाठी आयोग नेमला नाही यामुळे हे आरक्षण रद्द झाले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीत ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी बैठक झाली. याच्या आदेशाने नगर शहरात चक्का जाम करण्याचे. नियोजन करण्यात आले. यासाठी भाजप सरकारने या सरकारला आपली ताकद दाखवण्यासाठी चक्का जाम आंदोलन करणार आहे. या आंदोलन ची रणनिती आखण्यासाठी शहर व तालुक्यातील भाजप कार्यकर्त्याची बेठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, अभय आगरकर, भैय्या गंधे, युवराज पोटे, सुनिल पंडित, सभापती अभिलाष धिगे, उपसभापती संतोष म्हस्के, विलास शिंदे, हरीभाऊ कडौले, रेवणनाथ चोभे, दिलीप भालसिंग, मनोज कोकाटे, बाळासाहेब निमसे, बाबासाहेब रवर्से, उद्धव कांबळे, शिवाजी कार्ले, बन्सी कराळे, संतोष कुलट, बबनराव आव्हाड, बहिरू कोतकर, वंसतराव सोनवणे, संजय जपकर, जालींदर कदम, कैलास पठारे यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here