आराधना राना यांना नालन्दा ‘प्राइड ऑफ नॉलेज अवॉर्ड 2021’ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 22, 2021

आराधना राना यांना नालन्दा ‘प्राइड ऑफ नॉलेज अवॉर्ड 2021’

 आराधना राना यांना नालन्दा ‘प्राइड ऑफ नॉलेज अवॉर्ड 2021’


अहमदनगर ः
युवा विद्यार्थ्यांना उच्च स्वप्न पाहण्यास व साध्य करण्यासाठी श्रीमती आराधना राणा (शैक्षणिक) संचालिका, द आयकॉन पब्लिक स्कूल यांच्या योगदानाबद्दल त्यांना ‘प्राइड ऑफ नॉलेज अवॉर्ड 2021’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आले आहे. हा सन्मान प्राप्त करण्यासाठी 50 देशांमधून प्राप्त झालेल्या 1100 नामांकनांपैकी 300 वैज्ञानिक, शिक्षणतज्ज्ञ, नवनिर्मिते होते. 18 जून रोजी ऑनलाइन समारंभात हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. ह्या पुरस्कारासाठी 300 नामांकनांपैकी श्रीमती आराधना राणा यांचा समावेश होता. हा पुरस्कार स्विकारताना त्या म्हणाल्या की हा पुरस्कार मिळाल्याचा मला खूप अभिमान वाटतो कारण द आयकॉन पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी त्यांना  देशाच्या भवितव्याबद्दल प्रचंड आशा दिली आहे. त्यांच्या या पुरस्कारासाठी संस्थेचे चेअरमन अशोक मुथा, अध्यक्षा मंगला मुथा विश्वस्त निर्मल मुथा, विश्वस्त अमित मुथा, कर्नल आर.सी.राणा, प्रचार्या दीपिका नगरवाला यांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment