इस्कॉनतर्फे दि.19 ते 21 दरम्यान भारतव्यापी युथ फेस्टीव्हल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 15, 2021

इस्कॉनतर्फे दि.19 ते 21 दरम्यान भारतव्यापी युथ फेस्टीव्हल

 इस्कॉनतर्फे दि.19 ते 21 दरम्यान भारतव्यापी युथ फेस्टीव्हल

25 लाख युवकांचा विश्वविक्रमी सहभाग फेस्टीव्हलमधील सहभागाचे रजिस्ट्रेशन फ्री


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः इस्कॉनतर्फे इंटरनॅशनल योगा डे निमित्त शनिवार दि.19 ते सोमवार 21 जून 2021 दरम्यान भारतव्यापी युथ फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टीव्हलमध्ये भारतभरातील 25 लाख युवक सहभागी होणार असून युवकांना या फेस्टीव्हलमध्ये सहभागी होण्याकरिता फ्री रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. युवकांचा विश्वविक्रमी सहभाग असणारा हा फेस्टीव्हल  इस्कॉनचे कार्य युवापिढीत रूजवण्यास उपयुक्त ठरणार आहे, असे येथील पाइपलाईन रोडवरील इस्कॉन मंदिराचे व्यवस्थापक श्री. गिरीवरधारी दास यांनी सांगितले.
ते म्हणाले, इस्कॉनतर्फे आयोजित करण्यात आलेला हा नॅशनल मेगा युथ फेस्टीव्हल  ’इन्स्पायरो 2021’ या नावाने संपन्न होणार आहे. श्रीमद् भगवतगीता आजच्या संगणक युगातही कुटूंबव्यवस्था, शिक्षण, बिझनेस, उद्योग, व्यवसाय अशा सर्व जीवनोपयोगी क्षेत्रास कशी उपयुक्त आहे ? हे या फेस्टीव्हल मधील वक्त्यांच्या मार्गदर्शनामधून स्पष्ट होईल. भारतीय संस्कृतीमध्ये भक्तीला विज्ञानाचा कसा आधार आहे? हे वक्त्यांच्या व्याख्यानांमधील अनेकविध उदाहरणे दाखवून देतील.
शनिवार दि.19 जून 2021 ला सायंकाळी 7 ते रात्री 8.30 या वेळेत मेंबर ऑफ फोर्ट चॅरिटीज श्री.अल्फ्रेड बी फोर्ड यांचे ’इस्ट मिटस् वेस्ट’ या विषयावर इंग्रजीमधून व्याख्यान होईल. रविवार दि.20 जून 2021 ला दुपारी 12 ते 2 या वेळेत फाउंडर अ‍ॅण्ड सीईओ, बडा बिझनेसचे श्री. डॉ.विवेक बिंद्रा यांचे ’बिझनेस योगा फ्रॉम भगवतगीता’ या विषयावर हिंदीमधून व्याख्यान होईल. सोमवार दि.21 जून 2021 ला सायंकाळी 7 ते रात्री 8.30 या वेळेत व्हाइस क्लबचे डायरेक्टर आणि भक्ती योगा टिचर श्री. राधेशामजी दास ( एम.टेक. आय.आय.टी. मुंबई ) यांचे ’डिस्कव्हर युवर सेल्फ’ या विषयावर इंग्रजीमधून व्याख्यान होईल.
इस्कॉनच्या या ऑनलाईन फेस्टीव्हलमध्ये सहभागी झालेल्या युवकांमध्ये ऑनलाईन स्पर्धा घेण्यात येऊन विविध आकर्षक बक्षिसांची भेट देण्याचेही खास नियोजन करण्यात आले आहे.  युवकांनी ुुु.सर्ळींशीीलर्श्रील.ळप या वेबसाईटवर विनामूल्य रजिस्ट्रेशन करून या नॅशनल मेगा युथ फेस्टीव्हलचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगर शहरातील इस्कॉन मंदिराचे व्यवस्थापक श्री. गिरीवरधारी दास यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment