संदीप पाटील वराळ यांच्या वर्गमित्रांनी केली कोव्हीड सेंटरला मदत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 27, 2021

संदीप पाटील वराळ यांच्या वर्गमित्रांनी केली कोव्हीड सेंटरला मदत

 संदीप पाटील वराळ यांच्या वर्गमित्रांनी केली कोव्हीड सेंटरला मदत

1996 दहावी माजी विद्यार्थी 18 हजार 351 रुपयांची देणगी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः निघोजचे माजी सरपंच व बाजार समितीचे माजी उपसभापती 1996 ला दहावीत शिक्षण घेत होते त्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आज 18 हजार 351 रुपयांची देणगी संदीप पाटील वराळ आरोग्य मंदीर कोव्हिड सेंटरला दिली.यावेळी या माजी विद्यार्थ्यांनी साधारण 1990 ते 96 कार्यकाळ आठवत संदीप पाटील यांच्या आठवणींना नक्कीच उजाळा दिला.
शाळेमध्ये कुणालाही काही मदत लागली तरी विद्यार्थी संदीप पाटील वराळ यांच्याकडे बोट करीत असायचे पहिल्यापासून सामाजीक आवड असणारे हे व्यक्तीमत्व म्हणजे संदीप पाटील आजोबा सहकारमहर्षी किसनराव वराळ पाटील वडील मच्छिंद्र पाटील उर्फ आबा सातत्याने त्यांच्या संपर्कात असणारा म्हणजे सर्वांचा आवडता संदीप लहानपणापासून सामाजिक कामांच्या माध्यमातून नेहमीच जनतेच्या संपर्कात असणारे नेतृत्व जरी आपल्यात नसले तरी सुद्धा गेली चार साडेचार वर्षात असा एकही दिवस नाही की संदीप पाटील यांची आठवणच आली नाही  आठ ते दहा वर्षांच्या कालावधीत पदांचा हव्यास न होता ही पंचायत समिती बाजार समीती सरपंपदाची हॅटट्रिक करणारे असे नेतृत्व निघोजच्या पंचक्रोशीतच काय परंतु तालुक्यात सापडण दुर्मिळ मात्र समाजकारणाचा हाच वसा सचिनभाऊ व वराळ कुटुंबियांनी व त्यांच्या शेकडो सहकार्‍यांनी अव्याहतपणे सुरू ठेउन सामाजिक कामांत संदीप पाटील वराळ यांच्या नावाला उजाळा देतानाच निघोज आणी पंचक्रोशीतील गावांचा नावलौकिक वाढवला  1996 दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी भरभरून देणगी संदीप पाटील वराळ आरोग्य मंदीर कोव्हिड सेंटरला दिल्याबद्दल संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन व निघोज ग्रामस्थ यांनी संबंधित माजी विद्यार्थी यांना धन्यवाद व्यक्त करीत  आभार मानले आहेत यावेळी देणगीचा धनादेश स्विकारताना सरपंच चित्राताई सचिन वराळ पाटील सुनिल पवार अल्पसंख्याक समाजाचे मार्गदर्शक अस्लमभाई इनामदार व 1996 बॅचचे माजी विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment