घर घर लंगर सेवेने दिलेले योगदान कौतुकास्पद - खा. विखे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, May 29, 2021

घर घर लंगर सेवेने दिलेले योगदान कौतुकास्पद - खा. विखे

 घर घर लंगर सेवेने दिलेले योगदान कौतुकास्पद - खा. विखे

लंगर सेवेच्या घर घर निशुल्क ऑक्सिजन सेवेचा लोकार्पण,25 ऑक्सिजन सिलेंडरची मदत


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोनाच्या संकटकाळात घर घर लंगरसेवेने दिलेले निस्वार्थ योगदान कौतुकास्पद आहे. या संकटकाळात गरजूंना लंगर सेवेचा आधार मिळाल्याने संकटाची भीषणता कमी होण्यास मदत झाली. निस्वार्थ देवा देण्यासाठी मोठे मन लागते. मोठ्या मनाने सर्व देवादार योगदान देत आहे. लोकप्रतिनिधींच्या एक पाऊल पुढे जाऊन लंगर सेवेने सर्वसामान्यांना विविध प्रकारची मदत दिली. अशा जागृक नागरिकांच्या निस्वार्थ भावनेने कार्य सुरु राहिल्यास शहराला एक वैभव प्राप्त होणार असल्याची भावना खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली.
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असताना घर घर लंगर सेवेच्या वतीने गरजू रुग्णांसाठी 25 ऑक्सिजनचे सिलेंडर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घरात वापरण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या घर घर ऑक्सिजन सेवेचा लोकार्पण प्रसंगी खासदार विखे बोलत होते.
पुढे खासदार विखे म्हणाले की, म्युकॉरमायकोसिस या बुरशीजन्य आजार होत असताना, कोरोना उपचारादरम्यान नियमीत स्वच्छता व काळजी घेण्याची आवश्यकता आहे. या आजाराच्या उपचारासाठी विळद घाटात उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात हरजितसिंह वधवा यांनी कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. गरजू रुग्णांना ऑक्सिजन मिळण्यासाठी लंगर सेवेच्या माध्यमातून ऑक्सिजन कॅनचे मोफत वाटप करण्यात आले. सर्वसामान्य कोरोना रुग्णांना खासगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेडची सुविधा घेण्यासाठी पैसे नसतात. अशा रुग्णांना घरीच डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली निशुल्क ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यासाठी लंगर सेवेने पुढाकार घेतला आहे. ऑक्सिजन न मिळाल्याने कोणत्याही रुग्णांचे जीव जाऊ नये, या भावनेने घर घर लंगर सेवा योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले. घर घर लंगरसेवेच्या वतीने निशुल्क ऑक्सिजन सिलेंडर मिळवण्यासाठी 9423162727, 9890671671 या दोन नंबरवर संपर्क साधायचा आहे. रुग्णाचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल, डॉक्टरचे संमपतीपत्र व खालवलेल्या ऑक्सिजन पातळीची माहिती देणे बंधनकारक आहे. ऑक्सिजन सिलेंडर घेताना सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने 15 हजार रुपये आगाऊ रकमेचा चेक लंगर सेवेच्या नावाने घेतला जाणार आहे. सदर व्यक्तीने सिलेंडर जमा केल्यास तो चेक पुन्हा त्या व्यक्तीला  परत केला जाणार आहे. ही सेवा निशुल्क राहणार असल्याचे लंगर सेवेच्या वतीने सांगण्यात आले असून, गरजू घटकातील रुग्णांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन लंगर सेवेच्या वतीने करण्यात आले आहे.
 झेंडीगेट, हॉटेल अशोका येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी लंगरसेवेचे हरजितसिंह वधवा, जनक आहुजा, प्रितपालसिंग धुप्पड, रितू अ‍ॅबट, अजय पंजाबी, उध्दव तलरेजा, प्रशांत मुनोत, सतीश गंभीर, राजेंद्र कंत्रोड, राहुल बजाज, किशोर मुनोत, राजा नारंग, सुनिल छाजेड, डॉ.सिमरन वधवा, करण धुप्पड, गोविंद खुराणा, मनोज मदान, राहुल शर्मा, नारायण अरोरा, सनी वधवा, कैलाश नवलानी, सिमर वधवा, अर्जुन मदान, सुनिल थोरात, बलजितसिंग बिलरा, मनप्रीतसिंग धुप्पड, सुरज तोरणे, पुरुषोत्तम बेट्टी, शरद बेरड, प्रमोद पंतम, अनीश आहुजा, राजबीरसिंग संधू, जतीन आहुजा, संदेश रपारिया आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here