प्रभाग क्र.११ मध्ये सभापती अविनाश घुले यांच्या प्रयत्नातून हातामपूरा रस्त्याचे काम सुरू - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, May 21, 2021

प्रभाग क्र.११ मध्ये सभापती अविनाश घुले यांच्या प्रयत्नातून हातामपूरा रस्त्याचे काम सुरू

 प्रभाग क्र.११ मध्ये सभापती अविनाश घुले यांच्या प्रयत्नातून हातामपूरा रस्त्याचे काम सुरू

पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांची कामे मार्गी लावा-आ.संग्राम जगतापनगरी दवंडी

अहमदनगर प्रतिनिधी- शहरांमध्ये विविध रस्त्यांचे विकास कामे मंजूर आहे परंतु फेज 2 पाणी योजना व अमृत भुयारी गटारचे काम सुरू असल्यामुळे शहरातील काही रस्त्यांची कामे करता येत नव्हती परंतु आता जलद गतीने पावसाळ्या पूर्वी रस्त्याची कामे मार्गी लावण्याच्या सूचना मनपा प्रशासनाला दिल्या असून त्यांनी ठेकेदारा मार्फत लवकरात-लवकर दर्जेदार कामे करून घ्यावीत, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी प्रभाग क्र.११ मध्ये विविध-विकासकामा साठी निधी प्राप्त करून घेतला आहे. प्रामुख्याने जुन्या गावठाण शहरांमध्ये भुयारी गटार योजनेचे काम सुरु असल्यामुळे बहुतांश रस्ते खड्डेमय झाले आहेत. या रस्त्यांची कामे मार्गी लागणे गरजेचे आहे,यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.

       स्थायी समिती सभापती अविनाश अविनाश घुले यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक ११ मध्ये हातापुरा रस्ता कामाची पाहणी करताना आ.संग्राम जगताप यावेळी समवेत इम्रान जहागिरदार,इम्रान शेख,समीर शेख,सुनील मोरे,इसाक सय्यद,फैरोज सय्यद,इकबाल सय्यद उपस्थित होते.

        स्थायी समिती सभापती अविनाश घुले पुढे म्हणाले की,आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली शहर विकासाला चालना देण्याचे काम सुरु आहे.प्रभाग क्र. ११ मध्ये आ. संग्राम जगताप यांनी विकास कामासाठी मोठा निधी प्राप्त करून दिला आहे,जिल्हाधिकारी कार्यलय हे जिल्हाचे मुख्य केंद्र असल्यामुळे जिल्हाभरातून नागरिक या ठिकाणी आपले कामे घेऊन येत असतात या भागातील रस्ते दर्जेदार असावे यासाठी आ.संग्राम जगताप यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी मिळवून दिल्या मुळे या रस्त्याचे कामे सुरू आहे. याच बरोबर शहरातील प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहे असे म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here