गरिबाचा एक रुपयाची मदत ही देखील मला एक लाखा सारखी : सुजित झावरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, May 14, 2021

गरिबाचा एक रुपयाची मदत ही देखील मला एक लाखा सारखी : सुजित झावरे

 सुजित झावरे पाटील दीनदुबळ्यांचे नेते - प्रकाश इघे सर 

गरिबाचा एक रुपयाची मदत ही देखील मला एक लाखा सारखी : सुजित झावरेनगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

आज तालुका लोहार समाजाच्या वतीने सुजित झावरे पाटील मित्र परिवाराच्या माध्यमातून सुरू केलेल्या  स्व. मा.आ.वसंतराव झावरे पाटील कोविड सेंटरसाठी ५,५५५ रुपये मदत करण्यात आली. यावेळी प्रकाश इघे सर म्हणाले की, स्व. दादांनी तालुक्यातील सर्वसामान्याना सोबत घेऊन काम केले. आमच्या सारख्या सामान्य माणसांना काम करण्याची संधी दिली. तोच वारसा सुजित झावरे पाटील पुढे नेत आहे. आज आनंद वाटत आहे की आज ही झावरे कुटूंबिय तालुक्यातील कोरोना सारख्या महामारी मध्ये कोविड सेंटर चालू करून स्वतः वेळ देत आहे. रुग्णांची आपल्या कुटुंबातील सदस्य असल्यासारखी विचारपूस करीत आहे. आज  सुजित पाटील यांच्या रुपात आम्हाला दादा दिसत आहे. सुजित झावरे पाटील हेदीनदुबळ्यांचे नेते असल्याचे यावेळी प्रकाश इघे सर यांनी सांगितले. 

यावेळी सुजित झावरे पाटील म्हणाले की, आज या कोरोना महामारी मध्ये आपल्या सारख्या समाजबांधवांची नितांत गरज आहे. गरिबाचा एक रुपयाची मदत ही देखील मला एक लाख सारखी आहे.

यावेळी लोहार समाज संघटनेचे अध्यक्ष भास्कर पोपळघट, कार्याध्यक्ष सुदाम भालके, किरण पोपळघट व इतर सभासद उपस्थितीत होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here