अखिल भारतीय जैन श्वेतांबर गुजराती समाज महासंघाच्या प्रयत्नास यश साधू संतांचे होणार आता आधारकार्डविना लसीकरण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 8, 2021

अखिल भारतीय जैन श्वेतांबर गुजराती समाज महासंघाच्या प्रयत्नास यश साधू संतांचे होणार आता आधारकार्डविना लसीकरण

 अखिल भारतीय जैन श्वेतांबर गुजराती समाज महासंघाच्या प्रयत्नास यश साधू संतांचे होणार आता आधारकार्डविना लसीकरण


नगरी दवंडी

अहमदनगर

आपल्या गुजराथी समाज महासंघातर्फे आपण जैन धर्मीय साधु- साध्वी समुदयासह सर्व धर्मीय साधु समुदयाला कोव्हिड लसीकरण करण्या संदर्भात मा.राज्यपाल महोदय तथा मुख्यमंत्री,आरोग्यमंत्री, आरोग्य राज्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रहमंत्री, विरोधी पक्षनेता महाराष्ट्र यांना गुजराथी समाज महासंघातर्फे  महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र शहा यांच्या नेतृत्वात निवेदन ईमेल वर पाठवले होते तसेच मा.आरोग्य राज्य मंत्री श्री राजेन्द्र पाटील यड्रावकर यांची भेट घेऊन या बाबत एक निवेदन दिले होते. 

अल्पसंख्यक समितीचे उप-प्रमुख श्री यश प्रमोद शहा यांनी मा.राज्यपाल महोदय तसेच आरोग्य विभाग मंत्रालय यांच्याबरोबर फोन वरुन बोलणे केले होते.त्यानुसार या विषयावर त्वरित निर्णय घेण्यासाठी मा.राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्र शासन आरोग्य विभागास आदेश दिले हाेते  तसेच केंद्र शासनास या अडचणींबाबत कळवले होते, त्याचप्रमाणे आरोग्य विभाग महाराष्ट्र यांनी केंद्र शासनाकडे या बाबत पाठपुरावा केला होता. *केंद्र शासनाने याबाबतचे सुधारित आदेश काढले आहेत.*

 या आदेशानुसार *राज्य सरकारने या बाबत सर्व जिल्ह्यांना तश्या सूचना जारी के्ल्या आहेत व विशेष बाब म्हणून साधू संतांचे लसीकरण करून घ्यावे असे आदेश काढले आहेत* असे 

मंत्रालयातून फोनद्वारा तथा ईमेलद्वारे *गुजराथी समाज महासंघ अल्पसंख्यांक समिती उप- प्रमुख श्री यश शहा यांना आज कळवले आहे*. यामुळे आता साधू संतांचे लसीकरण करणे शक्य झाले आहे.गुजराती समाज महासंघाच्या वतीने सर्वांचे आभार मानले आहेत .

*राज्यातील सर्व समाज संघांना विनंती करण्यात येत आहे की आपण आपल्या शहर/ जिल्ह्यातील साधूसंतांचे लसीकरण लवकरात लवकर करून घेणेबाबत* आणि या बाबत मदत व अधिक माहितीसाठी *गुजराती समाज महासंघ राज्य समीती सदस्य* यांच्या बरोबर संपर्क करावा असे आवाहन *महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र शहा* यांनी गुजराती समाज महासंघाच्या वतीने सकल समाजास केले आहे.

No comments:

Post a Comment