पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर.... फिरस्त्यांची केली कोरोना चाचणी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 24, 2021

पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर.... फिरस्त्यांची केली कोरोना चाचणी.

 पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर.... फिरस्त्यांची केली कोरोना चाचणी.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या पाच दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्याही कमी प्रमाणामध्ये झाली आहे. त्यातच दुसरीकडे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गेल्या आठवडाभरापासून जे कोणी विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत त्यांची वाहने जप्त करण्याबरोबरच त्यांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश दिले होते, त्याचे पालन नगर जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यांमध्ये सध्या करण्यात येत आहे.
 कोरोना रुग्णसंख्या नगर जिल्ह्यामध्ये कमी होत चालली असताना दुसरीकडे सकाळपासूनच  विनाकारण फिरण्यार्‍याची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे जिल्हा पोलिस प्रशासनाने आज नगर शहरामध्ये सुमारे 250 हून अधिक जणांची कोरोना चाचणी केली. नगर जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यामध ही धडक कारवाई सध्या सुरू आहे. सकाळी सात ते अकरा या वेळेमध्ये नगर शहरातील मार्केट येथील कृषी खात्यातील दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता त्यामुळे मार्केट यार्ड परिसरामध्ये सकाळपासूनच गर्दी होती. शहरांमध्ये सकाळपासूनच विनाकारण फिरणार्‍याची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नगर शहरातील जिल्हा रुग्णालयात बाहेर तसेच दिल्लीगेट, चितळे रोड, माळीवाडा डीएसपी चौक आदी ठिकाणी पोलिसांनी अनेक वाहने अडवून संबंधितांची चौकशी केल्यानंतर अनेक जण विनाकारण फिरत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांची तात्काळ त्या ठिकाणी चाचणी करण्यात आलेली आहे या चाचणीचा अहवाल येत्या एक-दोन दिवसांमध्ये कळणार आहे. नगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये अशा प्रकारे कारवाया गेल्या आठवडाभरापासून सुरू झालेल्या असून यामध्ये अनेक जण है पॉझिटिव्ह आलेले आहे. अशा लोकांवर कोविड सेंटर मध्ये उपचार सुरू करण्यात आलेले आहेत गेल्या आठवडाभर  धडक कारवाईमुळे हाती घेतल्यामुळे दंडात्मक कारवाई सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे लाखो रुपयांचा दंड सुद्धा पोलिसांनी वसूल केलेला आहे. नगर शहरामध्ये डीएसपी चौकातून शहराच्या दिशेने येणारी लक्झरी बसला थांबवुन त्यातील 32 प्रवाशांची पोलिसांनी चौकशी केली, त्यातील सर्वांची करोना चाचणी सुद्धा पोलिसांनी आज केली.कोरोना रुग्ण संख्या जरी कमी झाली असली तरी निर्बंध उठले तर दुकाने सुरू केली जाणार आहे.महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी संबंधित दुकानदारांनी कोरोना चाचणी करून घ्यावी अशा प्रकारचे आदेश दिल्यानंतर नगर शहरामध्ये अनेक व्यापारी हे  चाचणीसाठी तयार आहेत तर काहींनी  चाचणी सुद्धा केलेली आहे.

No comments:

Post a Comment