हे बालविवाह थांबणार तरी कधी?? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 24, 2021

हे बालविवाह थांबणार तरी कधी??

 हे बालविवाह थांबणार तरी कधी??


ति
ला शिकायचं आहे, उच्च शिक्षण घेऊन आकाशाला गवसणी घालायची आहे; पुरूषापेक्षा कुणीही कमी लेखू नये, म्हणून आपलं कर्तुत्व सिद्ध करून दाखवायचं आहे परंतु पुरोगामी राज्याचं बिरूद मिरवणार्‍या महाराष्ट्रात आजही होणारे बालविवाह तिच्या पंखांना कात्री लावू पाहत असतील तर हे दुर्दैवच नाही का!  एक मुलगी शिकली तर अख्खं घर साक्षर होतं, हे वास्तव असलं तरी मुलीला डोक्याचा ताप समजणार्‍या घाणेरड्या मानसिकतेतील काही मंडळी तिला अल्पवयातच विवाह बंधनात अडकवण्याचा अपराध करीत आहेत. मागील वर्षा प्रमाणे या वर्षी कोरोना या महामारीमुळे लोकडाऊन लावण्यात आले आहे. त्यामुळे बालविवाह चे प्रमाण अधिक प्रमाणात होत असताना समोर येत आहे. बालविवाह च्या तक्रारीचा डॉगर उभा होता दिसत आहे. चाईल्ड लाईन ही राष्ट्रीय हेल्पलाईन असल्याने अनेक बालकांच्या अडचणी सोडवण्यासाठी 1098 या हेल्पलाईन नंबर  फोन येत आहे . यामध्ये प्रामुख्याने बालविवाहच्या केसेस पण येत आहे . अनेक जागरूक नागरिक बालविवाह ची माहिती चाईल्ड लाईन च्या 1098या हेल्पलाईन देत आहेत . याप्रमाणे 21 मे रोजी चाईल्ड लाईनच्या हेल्पलाईन ला श्रीगोंदा तालुक्यातील भनगाव येथे होणार्‍या अल्पवयीन मुला- मुलीचा बालविवाह रोखण्यात यश आले आहे. सविस्तर माहिती अशी की , 20 मे रोजी चाईल्ड लाईनच्या 1098 या हेल्पलाईनला श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव या गावात लपून छापून बालविवाह होणार आहे ,अशी माहिती मिळाली . ही माहिती मिळताच तबडतोप त्याच दिवशी मुलीची वयाची खात्री करून ही माहिती पोलीस कंट्रोल 100 नंबर ला कळवली . श्रीगोंदा पोलीस स्टेशन ला माहिती दिली . त्याचबरोबर महिला व बालविकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा बाल कल्याण समिती, श्रीगोंदा येथील गट विकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, भनगाव येथील ग्रामसेवक म्हणजे भनगाव चे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी या सर्व यंत्रणांना पत्रव्यवहार करून माहिती देण्यात आली. श्रीगोंदा पोलीस निरीक्षक  यांनी तबडतोप आपले पथक पाठवून सदर बालविवाह होण्यापूर्वीच थबवण्यात यश आले आहे.
बालविवाह थांबवला म्हणजे यंत्रणांची जबाबदारी येथच समाप्त होते का
तर नाही सदर बालविवाह थांबला असला तरी यंत्रणांची जबाबदारी ही संपत नाही तर हा बालविवाह पान्हा होऊ नये यासाठी वर-वधू यांच्या पालकांकडून लेखी जबाब घेणे खूप  गरजेचे आहे . ज्या ग्रामपंचायत च्या हद्दीत घटना आहे तेथील ग्रामसेवक आणि गाव बाल संरक्षण समिती यांनी त्यांना नोटीस  बजावून बाल कल्याण समिती समोर हजर करून त्याच्याकडून सदर मुलीच्या 18 वर्ष आणि मुलाच्या 21 वर्षाच्या आत त्याचा विवाह लावणार नाही , याप्रमाणे हमीपत्र लिहून घेतले जाते . नंतर बाल कल्याण समिती ही सदर या कुटूंबाकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी सदर ग्रामपंचायत ला दिली जाते आणि सदर मुलीच्या घरी 15 दिवसाला सदर मुलीच्या घरी गृहभेट देण्यास नोटीस देतात . तो अहवाल बाल कल्याण समिती ला दिला जातो . या प्रमाणे ही सगळी कार्यवाही करत सदर मुलीवर आणि त्या कुटुंबावर मुलीचे अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत लक्ष दिले जाते . चाईल्ड लाईन यांचा पाठपुरावा करत च असते . असे बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर बाल संरक्षण समिती असून या समिती अंतर्गत बाल संरक्षण कक्ष आहे. सोबतच या मुलांची काळजी आणि संरक्षणासाठी बालकल्याण समिती देखील काम करत आहे. सोबतच राज्य सरकारमार्फत प्रत्येक गावात ग्राम बाल संरक्षण समिती गठीत करण्यात आली आहे आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या अधिनियम 2006 कलम 16/1 प्रमाणे ग्राम बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून ग्रामसेवकांची नेमणूक केली आहे. तर या समितीमध्ये अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्यासह, पोलीस पाटील यांचा देखील सहभाग असतो. मात्र गाव पातळीवर या कायद्याची जनजागृती करण्यास स्थानिक अधिकार्‍यांची उदासीनता पाहायला मिळते
का केले जातात बालविवाह?
कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागात लोक परतले होते. त्यात अनेक गरीब कुटुंबांनी लग्नाचा खर्च कमी लागत असल्याने आपल्या अल्पवयीन मुलांचे लग्न लावण्याचा निर्णय घेतला. तर इतरवेळी मुलींचे कमी वयात लग्न लावून देण्याचे प्रकार जास्त असतात. याचे एक कारण म्हणजे पालकांची आर्थिक स्थिती....पैसा नसल्याने अनेकवेळा गरीब पालक मुलींचे लग्न जास्त वयाच्या व्यक्तीशी लावून देतात. त्यामुळे खर्‍या अर्थाने राज्य, देश कुपोषणमुक्त सुदृढ करायचा असेल तर समाजातील प्रत्येक नागरिकाने आपली नैतिक जबाबदारी समजून आपल्या भोवताली होत असलेले बालविवाह रोखण्यात मदत करावी, असे आवाहन सरकारतर्फे करण्यात येते. बालविवाहांची माहिती देणार्‍यांची नावे गोपनीय ठेवली जातात. त्यामुळे अशा घटना आढळल्यास चाईल्ड लाईन च्या 1098 या मोफत क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here