प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने राहाता येते किराण्याचे गरजू कुटुंबांना वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 17, 2021

प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने राहाता येते किराण्याचे गरजू कुटुंबांना वाटप

 प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने राहाता येते किराण्याचे गरजू कुटुंबांना वाटप

गोर गरिबांची चुल पेटऊया : प्रहारचा उपक्रम



नगरी दवंडी

शिर्डी - कोरोना ताळेबंदी - मध्ये राहाता तालुक्यातील निराधारांना प्रहारचा आधार देण्यात आला. गोरगरिबांचे दैवत राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती राहाता तालुका यांच्या अथक परिश्रमातून राहाता तालुक्यात, चला गोरगरिबांची चूल पेटवू या हे अभियान सुरू आहे. राज्यात कोरोना टाळेबंदी सुरू असताना गोरगरीब, निराधार ,दिव्यांग बांधवांची प्रचंड हेळसांड होत आहे अशातच प्रहारच्या वतीने सुरू असलेल्या या रोटी अभियाना अंतर्गत गोरगरिबांना मोठा आधार मिळत आहे. प्रहार राहाता यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शिर्डी शहर, राहाता शहर, रुई, कोहकी, डोर्हाळे, नांदूखी खुर्द, बुदृक, कनकुरी, केलवड, आडगाव, गोगलगाव तसेच लोणी खुर्द मधील हातावर पोट असणारे मजूर, निराधार, दिव्यांग बांधव तसेच अत्यंत गोरगरीब कुटुंबाना थेट घरपोहच एक महिना पुरेल एवढ्या किराणा किटचे वितरण करण्यात आले आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संघटक अभिजित कालेकर, जिल्हा सरचिटणीस अभिजित पाचोरे, राहाता तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष दिनेश शेळके, दिव्यांग क्रांती उपतालुकाध्यक्ष नितीन भन्साळी, राहाता तालुका संघटक वसंतराव काळे, राहाता शहर प्रमुख अविभाऊ सनासे, संदीप शिंदे यांच्या प्रचंड आर्थिक नियोजनातून आजपर्यंत तालुक्यात तब्बल दोनशेच्यावर किराणा किटचे वितरण करण्यात आले आहे. कोरोना महामारीत स्वतःचा जीव मुठीत धरून निराधार कुटुंबाना महिनाभराचा किराणा तसेच अन्नधान्य वितरित करणाऱ्या संपूर्ण प्रहार राहाता टीमला गोरगरिबांचे आशीर्वाद मिळत आहेत. राहाता तालुका पंचक्रोशीतील जनतेकडून तसेच अहमदनगर जिल्ह्यातील प्रहार पदाधिकाऱ्यांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे. यावेळी दिव्यांग क्रांती जिल्हा संघटक श्री शरद वारुळे, दिव्यांग तालुका अध्यक्ष श्री भाऊंनाथ गमे, लोणी खुर्द गावचे उपसरपंच श्री अनिलराव आहेर, नांदूखी खुर्द चे ग्रामपंचायत सदस्य विजय वाणी, दिपक घोगरे, अशोकराव खंडांगळे, विजय काकडे, जालिंदर लांडे, सोमनाथ लहामंगे, अमोल कडू, सुधाकर डांगे, रोमचंद कडू, जगन्नाथ सरोदे, मंगेश नळे, त्रिभुवन साहेब, सचिन आरने, रवींद्र चौधरी, अमोल चौधरी, साईनाथ दाभाडे, सुरेश गुगळे, नवनाथ पुंड, विशाल दाभाडे, रामदास तनपुरे, जयदीप सोळशे या राहता तालुका प्रहार पदाधिकाऱ्यांच्या खंबीर नियोजनातून तालुक्यातील, चला गोरगरिबांची चूल पेटवू या अभियानाची यशस्वी सुरुवात झाली आहे. तसेच ऋतिक पारखे व पत्रकार तुषार महाजन उपस्थित होते.

No comments:

Post a Comment