शिवसेनेच्या विविध उपक्रमातून आधार देण्याचे काम - दिलीप सातपुते - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 17, 2021

शिवसेनेच्या विविध उपक्रमातून आधार देण्याचे काम - दिलीप सातपुते

 शिवसेनेच्या विविध उपक्रमातून आधार देण्याचे काम - दिलीप सातपुते

स्व.अनिल राठोड यांच्या स्मरणार्थ अन्न पॅकिटाचे वाटप


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः दिवसेंदिवस वाढत्या कोरोना रुग्ण संख्येनेमुळे सर्वच हॉस्पिटल फुल झाले आहेत. सर्वसामान्यांना, गोर-गरीबांचा मोठा आधार ठरलेले जिल्हा रुग्णालयातही मोठ्या संख्येने रुग्ण अ‍ॅडमिट आहेत. रुग्णांची  सर्वच व्यवस्था हॉस्पिटलच्यावतीने चांगल्या पद्धतीने होत आहे. परंतु लॉकडाऊन असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक  समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या परिस्थितचा विचार करुन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या स्मरणार्थ रुग्णांच्या नातेवाईक़ांना तलरेजा परिवाराच्यावतीने अन्न पॅकिटाचे वाटप करुन दिलासा देण्याचे काम केले आहे. स्व.अनिल राठोड यांनी नेहमीच  सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले. तलरेजा परिवाराने नेहमीच शिवसेनेला सहकार्य केले आहे.  त्यांचे कार्य यानिमित्त पुढे सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.  आजच्या कोरोना संकट काळात केलेली छोटीशी मदतही मोलाची ठरत आहे. असे उपक्रम शिवसेनेच्यावतीने विविध भागात राबवुन आधार देण्यात येत आहे. असे उपक्रम राबवून या कोरोनाच्या संकटांवर सर्वांनी एकत्र येऊन मात करावयाची आहे, असे प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केले.
शिवसेना उपनेते स्व.अनिल राठोड यांच्या स्मरणार्थ तसेच चंदन  तलरेजा व लाभेश तलरेजा यांच्या स्मरणार्थ जिल्हा रुग्णालय येथे रुग्णांच्या नातेवाईकांना अन्न पॅकिटाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवेसना शहरप्रमुख दिलीप सातपुते, सोनल सैंदर, विशाल वालकर, सागर पिसाळ, संजू कुलकर्णी, सोनल सैंदर, तलरेजा परिवारातील सदस्य उपस्थित होते.या उपक्रमाचे रुग्णांच्या नातेवाईकांनी कौतुक करुन रुग्णालयात येणार्‍या अडचणींविषयी दिलीप सातपुते यांच्याशी चर्चा केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here