पन्नास टक्के सवलतीत रक्ताच्या सर्व तपासण्या - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, May 6, 2021

पन्नास टक्के सवलतीत रक्ताच्या सर्व तपासण्या

 पन्नास टक्के सवलतीत रक्ताच्या सर्व तपासण्या

समाजाचे ऋण फेडण्यासाठी नागेबाबा संस्थेची आरोग्य 

क्षेत्रात सेवा : कडूभाऊ काळेनगरी दवंडी

नगर – सध्याच्या परिस्थितीत नागरिकांना मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागत आहेत. सर्वसामान्य नागरिकांसाठी हॉस्पिटलचा खर्च आवाक्याच्या बाहेर जात असल्याने संत नागेबाबा माल्टीस्टेट उद्दोग समूह आता आरोग्य क्षेत्रात सेवा सुरु करण्याचे पहिले पाउल टाकत पन्नास टक्के सावलीतीच्या दरात रक्ताच्या सर्व तपासण्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त पॅथॉलॉजी लॅब सुरु केली आहे. समाजाचे आपण ऋणी आहोत या भावनेने नागेबाबा संस्था आरोग्य क्षेत्रात सेवा देण्यासाठी एकेक पाउल टाकणार आहे. नागरिकांच्या सर्वप्रकारच्या अडचणी दूर करण्यासाठी नागेबाबा संस्था प्रयत्शील आहे, अशी माहिती संत नागेबाबा माल्टीस्टेटचे चेअरमन कडूभाऊ काळे यांनी दिली.

नागेबाबा उद्दोग समूहाच्या झोपडी कँटीन जवळील संस्थेच्या मुख्य कार्यालात सुरु करण्यात आलेल्या डॉ. नंदकर ड्यागॉस्टिक लॅबॉरेटरीचे उद्घाटन संस्थेचे संचालक संजय मनवेलीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी चेअरमन कडूभाऊ काळे, तज्ञ डॉ. सोमनाथ नंदकर, तज्ञ संचालक सिए अमित फिरोदिया, डॉ.माधुरी नंदकर आदी उपस्थिती होते.

संजय मनवेलीकर म्हणाले, जस महादेवाला नमस्कार करण्या आधी नंदीला नमस्कार करावा लागतो तस हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु करण्या आधी रक्ताच्या तपासण्या कराव्या लागत आहेत. याचे महत्व ओळखून नागेबाबा संस्थेने रक्ताच्या सर्व महागड्या तपासण्या पन्नास टक्के सावलीतीच्या दरात सुरु करून सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. जास्तीतजास्त नागरिकांनी या सुविधाचा लाभ घ्यावा. संस्थेच्या सर्व शाखांमध्ये तपाण्यासाठी रक्त संकलनाची सेवा मिळणार आहे.

डॉ. सोमनाथ नंदकर म्हणाले, हॉस्पिटल मध्ये उपचार घेताना अनेक रक्ताच्या तपासण्यांसाठी आता मोठा खर्च लागत आहे. गरीब व गरजू नागरिकांना सहकार्य करण्याच्या भावेतून हे तपासणी केंद्र सुरु करत नागेबाबा संस्थेने मोठे सामाजिक दावित्व उचलले आहे. याठिकाणी सकळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत रक्ताच्या तपासण्या करण्यात येणार आहेत.

प्रास्ताविकात सीए अमित फिरोदिया यांनी नागेबाबा समूहच्या सामाजिक उपक्रमांची माहिती देत डॉ. रणजीत सत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पॅथॉलॉजी लॅब सुरु केली असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here