ढोकराई येथे एकल महिलांना किराणा साहित्य वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 24, 2021

ढोकराई येथे एकल महिलांना किराणा साहित्य वाटप

 ढोकराई येथे एकल महिलांना किराणा साहित्य वाटप


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील ढोकराई येथे ग्रामीण विकास केंद्र जामखेड या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.डॉ. अरुण जाधव आणि संस्थेचे संचालक बापूसाहेब ओहोळ लता सावंत यांच्या प्रयत्नातून पुणे येथील अ‍ॅड. विंदा महाजन, सत्येंद्र राठी , प्रकाश चांडक ,रूपाली खंदारे यांच्या माध्यमातुन येथील 31 एकल महिलांना पंधरा दिवस पुरेल एवढा किराणा देण्यात आला.
मागील वर्षीच्या पहिल्या कोरोनाच्या लाटे पेक्षा यावर्षीच्या कोरोणाच्या दुसर्‍या लाटेने सर्व सामान्य जनतेला फार मोठ्या प्रमाणात त्रस्त केले आहे .
कोरोना होईल या भीतीनेच सर्वसामान्य जनता हतबल झाली आहे. अशातच कोरोनाची चैन थांबवण्यासाठी शासनाने लॉकडाऊन केले. यामुळे सर्वसामान्य जनतेचे फार हाल झाले त्यातच एकल महिलांना कुटुंब चालवणे फार अवघड झाल्याने ग्रामीण विकास केंद्र जामखेड या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.डॉ. अरुण जाधव आणि संस्थेचे संचालक बापूसाहेब ओहोळ लता सावंत यांच्या प्रयत्नातून पुणे येथील अ‍ॅड. विंदा महाजन आणि त्यांचे सहकारी सत्येंद्र राठी , प्रकाश चांडक ,रूपाली खंदारे, यांनी स्वखर्चाने 31 एकल महिलांना पंधरा दिवस पुरेल एवढा किराणा देण्यात आला. यावेळी पुण्याहून आलेले अ‍ॅड. विंदा महाजन , सत्येंद्र राठी , प्रकाश चांडक , रूपाली खंदारे ,तर ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे लता सावंत , संतोष भोसले , सारिका गोंडे आणि लिंपणगाव चे सरपंच उदयसिंह जंगले , ग्रामपंचायत सदस्य संतोष चव्हाण  बापू ओहोळ ,समन्वयक सचिन भिंगारदिवे ,वैजीनाथ केसकर , संतोष चव्हाण , सागर भांगरे , संतोष भोसले , आणि लता सावंत , छाया भोसले , पल्लवी शेलार , सुनिता बनकर , उज्वला मदने , सुनिता बनकर , मनीषा काळे , ज्योती भोसले , विशाल पवार , द्वारका पवार , तुकाराम पवार , काजोरी पवार ,शरद काळे ,आसाराम काळे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here