विरोधी पक्षनेता संपत बारस्कर यांच्या प्रयत्नातून भिस्‍तबाग महल ते कुष्‍ठधाम ते तोफखाना पोलिस स्‍टेशन रस्‍त्‍याच्‍या कामाचा शुभारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, May 25, 2021

विरोधी पक्षनेता संपत बारस्कर यांच्या प्रयत्नातून भिस्‍तबाग महल ते कुष्‍ठधाम ते तोफखाना पोलिस स्‍टेशन रस्‍त्‍याच्‍या कामाचा शुभारंभ

 विरोधी पक्षनेता संपत बारस्कर यांच्या प्रयत्नातून भिस्‍तबाग महल ते कुष्‍ठधाम ते तोफखाना पोलिस स्‍टेशन रस्‍त्‍याच्‍या कामाचा शुभारंभ

विद्युत तारा नसलेल्‍या शहरातील पहिला रस्‍ता – मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप नगरी दवंडी 

नगर -  शहर विकासाला चालना दिल्‍यामुळेच आज विविध विकास कामे सुरू असल्‍यामुळे शहराचे विस्‍तारीकरण झपाटयाने वाढत आहे.  त्‍यामुळे विविध भागामध्‍ये नागरि वसाहती निर्माण होत आहे. नागरिकांचे  मुलभूल प्रश्‍न सोडविणे गरजेचे आहे या पार्श्‍वभूमीवर रस्‍त्‍याचे जाळे निर्माण करण्‍याचे काम सुरू आहे. भिस्‍तबाग महाल ते भिस्‍तबाग चौक ते कुष्‍ठधाम रोड प्रोफेसर कॉलनी चौक ते तोफखाना पोलिस चौकी दरम्‍यान रस्‍त्‍याचे काम सुरू असून हे काम लवकरच पूर्ण होवून नागरिकांसाठी खुला होणार आहे. हा रस्‍ता शहरातील मॉडेल रस्‍ता म्‍हणून ओळखला जाईल यासाठी जिल्‍हा नियोजन समितीच्‍या माध्‍यमातून या रस्‍त्‍यावरील विद्युत तारा जमिनी अंतर्गत घेण्‍यासाठी निधी उपलब्‍ध करून दिला. शहरातील हा पहिला रस्‍ता विद्युत तारा विना निर्माण झाला आहे. प्रभाग क्रमांक 1 मधील विरोधीपक्ष नेता मा.श्री.संपत बारस्‍कर, नगरसेविका मा.सौ.दिपालीताई बारस्‍कर, नगरसेवक मा.डॉ.श्री.सागर बोरूडे, नगरसेविका मा.श्रीमती मिनाताई चव्‍हाण, सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.बाळासाहेब बारस्‍कर यांच्‍या पाठपुराव्‍यामुळे या रस्‍त्‍याचे काम मार्गी लागले आहे. याचबरोबर कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर शहरातील आरोग्‍य व्‍यवस्‍था सक्षम करण्‍यासाठी उपाय योजना सुरू केल्‍या आहेत. तपोवन रस्‍त्‍याचे काम मार्गी लागल्‍यामुळे या भागाच्‍या विकासाला चालना मिळणार आहे शहराच्‍या सर्वागीन विकासासाठी प्रयत्‍न सुरू असून टप्‍प्‍या टप्‍प्‍याने ते प्रश्‍न मार्गी लागणार असल्‍याचे प्रतिपादन मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप यांनी केले्.

विरोधी पक्षनेता संपत बारस्कर यांच्या प्रयत्नातून तोफखाना पोलिस स्‍टेशन ,प्रोफेसन कॉलनी चौक, कुष्‍ठधाम रोड, भिस्‍तबाग चौक ते महालापर्यतच्‍या रस्‍त्‍याच्‍या डांबरीकरणाच्‍या कामाची पाहणी मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप व मा.महापौर श्री.बाबासाहेब वाळके यांनी पाहणी केली. यावेळी स्‍थायी समितीचे सभापती मा.श्री.अविनाश घुले, विरोधीपक्ष नेता मा.श्री.संपत बारस्‍कर, सभागृह नेता मा.श्री.रविंद्र बारस्‍कर, नगरसेवक मा.श्री.गणेश भोसले, डॉ.श्री.सागर बोरूडे, सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.बाळासाहेब पवार, उपायुक्‍त श्री.यशवंत डांगे, मा.श्री.युवराज चव्‍हाण, शहर अभियंता श्री.सुरेश इथापे, ठेकेदार श्री.भैय्या वाबळे आदी उपस्थित होते.

मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे म्‍हणाले की,  शहराचे प्र‍लंबित प्रश्‍न सोडविण्‍यासाठी मनपाच्‍या माध्‍यमातून प्रामाणिकपणे प्रयत्‍न केले आहे. विविध विकास कामासाठी मोठा निधी उपलब्‍ध करून दिला आहे. आज शहरातील बहुतांश रस्‍त्‍याची कामे मंजूर असून पावसाळया आधी पूर्ण करण्‍यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत. कुष्‍ठधाम रस्‍ता हा सावेडी उपनगराला जोडणारा महत्‍वाचा रस्‍ता आहे. या रस्‍त्‍याच्‍या कामासाठी मनपाच्‍या माध्‍यमातून मोठा निधी उपलब्‍ध करून दिला आहे असे ते म्‍हणाले.

विरोधीपक्ष नेता मा.श्री.संपत बारस्‍कर म्‍हणाले की, कुष्‍ठधाम ते महालापर्यत रस्‍त्‍याचे काम मार्गी लागावे यासाठी मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप व मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांच्‍याकडे पाठपुरावा केला. त्‍यामुळे या रस्‍त्‍यासाठी मोठा निधी उपलब्‍ध झाला. गजराज फॅक्‍टरी येथील पुलाचे रूंदीकरण केले. त्‍यामुळे या रस्‍त्‍यामुळे या भागाच्‍या वैभवात भर पडणार आहे. पावसाळयामध्‍ये या रस्‍त्‍याच्‍या दोन्‍ही बाजूने मोठमोठ वृक्ष लावून पर्यावरणाचा संदेश दिला जाणार आहे या भागाच्‍या दळण वळणाचा प्रश्‍न या रस्‍त्‍यामुळे सुटणार आहे  असे ते म्‍हणाले 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here