वाळूंज येथील कोविड सेंटर मधील अठरा कोरोना रुग्णांना डीचार्ज - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 3, 2021

वाळूंज येथील कोविड सेंटर मधील अठरा कोरोना रुग्णांना डीचार्ज

 वाळूंज येथील कोविड सेंटर मधील अठरा कोरोना रुग्णांना डीचार्ज

पुष्पगुच्छ देऊन निरोगी जीवन जगण्याच्या माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिल्या रुग्णांना शुभेच्छानगरी दवंडी

अहमदनगर प्रतिनिधी -कोरोना संसर्ग विषाणूला थांबवायचे असेल तर विलगीकरण कक्ष अत्यंत महत्त्वाचा आहे. कोरोनाचा विषाणू हा संसर्ग विषाणू आहे एका व्यक्तीपासून अनेक व्यक्तींना संसर्ग होण्याची भीती मोठ्या प्रमाणात आहे. हा संसर्ग थांबवण्यासाठी कोविड सेंटरची गरज आहे ही गरज ओळखून मा.खा.कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने वाळुंज येथील कोविड सेंटरमधील  18 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आज या सर्व रुग्णांना वाळुंज कोविड सेंटर मधून डिस्चार्ज देण्यात आला यावेळी सर्व रुग्णांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करून त्यांना निरोगी जीवन जगण्याच्या शुभेच्छा माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिल्या 

        नगर तालुक्यातील वाळूंज येथील मा.खा.कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोविड सेंटर मधील 18 कोरोना रुग्णांना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून डिस्चार्ज देण्यात आला यावेळी बाजारसमितीचे उपसभापती संतोष मस्के, माजी सभापती हरिभाऊ कर्डिले,बाळासाहेब मेटे,दादा दरेकर,बाळासाहेब दरेकर,बाळासाहेब बेरड,रणजित लाळगे,भाऊ पांडुळे,

डॉ.अनिल ससाणे,डॉ.सविता ससाणे,आरोग्यसेविका योगिता चौकडे,उषा सावंत,वैशाली साळवे,विकास मस्के,डॉ.अमृत पारकड आदी उपस्थित होते.

       यावेळी बोलताना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले पुढे म्हणाले की, कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस भयानक होत चालली आहे. प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना विषाणूचे लक्षणे जाणवल्यास जवळ असणाऱ्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावे,आपल्याला जर कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असेल तर आपण आपल्या घरी किंवा आपल्या गावात गेल्यास इतरांनाही या कोरोना संसर्ग विषाणूची लागण होऊ शकते हे थांबवण्यासाठी प्रत्येकाने विलगीकरण कक्षात राहणे गरजेचे आहे तरच आपण कोरोनाची लढाई जिंकू शकतो व प्रत्येकाच्या आरोग्य निरोगी व सुदृढ राहण्यास मदत होईल आम्ही तुमच्या बरोबर आहोत असे ते म्हणाले.

      संतोष मस्के म्हणाले की, कोरोना संकट काळामध्ये रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये जागा उपलब्ध होत नसत यासाठी नगर कृषी उत्पन्न बाजार समितीने माणुसकीच्या भावनेतून वाळुंज येथे कोविड सेंटर सुरू करून रुग्णांना मोफत उपचार व सकस आहारा बरोबर विविध सुविधा उपलब्ध करुन दिले आहे.आज 65 कोरोना रुग्णांपैकी 18 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सर्व रुग्णांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 

     बरे झालेल्या रुग्णांच्या वतीने सांगण्यात आले की,कोविड सेंटरच्या वतीने देण्यात येणाऱ्या सुविधाया घरगुती प्रमाणे असल्यामुळे समाधान मिळाले आहे.

No comments:

Post a Comment