‘जितो’चे सर्व सभासद देत असलेले योगदान कौतुकास्पद : आनंदराम मुनोत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 18, 2021

‘जितो’चे सर्व सभासद देत असलेले योगदान कौतुकास्पद : आनंदराम मुनोत

 ‘जितो’चे सर्व सभासद देत असलेले योगदान कौतुकास्पद : आनंदराम मुनोत

अँटीबॉडी तपासणी शिबिराला मोठा प्रतिसाद


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः करोनाची महामारी गंभीर असली तरी तिला खंबीरपणे तोंड देणे आवश्यक आहे. आताचा काळ मानवतेची परीक्षा पाहणारा आहे. एकमेकांच्या मदतीतून, सहकार्यातूनच आपण या महामारीवर मात करू शकतो. सहकार्य व मदतीचा हाच मंत्र अंमलात आणत जितो अहमदनगरची टिम नगरमध्ये मोठे कार्य करीत आहे. करोना रूग्णांसाठी ऑक्सिजन बँक, गरजूंना जेवण देणे, आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी मदत करणे अशी अनेक जनहिताची कामे जितो करीत आहेत. जितोचे सर्व सभासद एकदिलाने समाजकार्यात योगदान देत असून त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे, असे प्रतिपादन अहमदनगर मर्चंटस् बँकेचे ज्येष्ठ संचालक आनंदराम मुनोत यांनी केले.
जितो अहमदनगरच्यावतीने सर्व सभासदांसाठी करोनाच्या पार्श्वभूमीवर अँटीबॉडी तपासणी शिबीर घेण्यात आले. स्टेशन रोडवरील नेवासकर पेट्रोलपंपावर झालेल्या या शिबिरासाठी थायरोकेअरच्या टिमने तांत्रिक सहकार्य केले. या शिबिराप्रसंगी आनंदराम मुनोत बोलत होते. यावेळी जितो अहमदनगरचे अध्यक्ष अमित मुथा, जवाहर मुथा, सुरेश कांकरिया, विजय गुगळे, दिलीप मुनोत, गौतम मुनोत, जितोचे सेक्रेटरी प्रितेश दुगड, सुनित मुनोत, परेश लोढा, सुनिल मुनोत, तुषार कर्नावट, पुनित भंडारी, सुमंगला मुनोत, जितो लेडीज विंगच्या मेघना मुनोत, राहुल मुनोत, थायरोकेअरचे सुरेश जोशी आदी उपस्थित होते.
अमित मुथा म्हणाले की, करोना महामारीचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहेत. अनेकांना करोना होवून गेला तरी त्याची लक्षणे जाणवली नसतील. अशा सर्वांसाठीच अँटीबॉडी तपासणी महत्त्वाची आहे. या तपासणीतून करोना होवून गेला की नाही हे समजते. तसेच एखाद्याच्या शरीरात विशिष्ट प्रमाणात अँटीबॉडी तयार झाल्या असतील तर ती व्यक्ती प्लाझमा दानही करू शकते. तसेच अँटीबॉडी तयार झालेल्या नसल्यास तातडीने लसीकरण केल्यास करोना प्रतिबंध अँटीबॉडी तयार होण्यास मदतही होते. याच दृष्टीने जितो परिवारातील सर्व सदस्य व त्यांच्या कुटुंबियांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

No comments:

Post a Comment