केशव माधव कोविड सेंटरमध्ये ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर दाखल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 18, 2021

केशव माधव कोविड सेंटरमध्ये ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर दाखल

 केशव माधव कोविड सेंटरमध्ये ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर दाखल


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः रा.स्वं.संघ,जनकल्याण समिती,नगर दक्षिण जिल्हा,हिंद सेवा मंडळाचे रामकरण सारडा विद्यार्थी गृह व अहमदनगर महानगर पालिका संचालित केशव माधव कोविड सेंटरमध्ये आज सहा ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर पुणे प्लँटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्सच्या सौजन्याने जनकल्याण समितिच्या वतीने दाखल झाले.छोटेखानी कार्यक्रमात त्यांचे लोकार्पण झाले.प्रारंभी भारतमातेच्या प्रतिमेचे मान्यवारांच्या हस्ते पूजन झाले.या लोकार्पण प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दक्षिण नगर जिल्हा संघचालक व जनकल्याण समितिचे प्रांताचे अध्यक्ष डॉ. रविंद्र साताळकर,बांधकाम व्यावसायिक जवाहर मुथा,इंडस्ट्रियल केटरर्सचे के.के.शेट्टी,सेवानिवृत न्यायाधीश रामचंद्र श्रोत्री,जनकल्याण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष अभय मेस्त्री,कार्यवाह डॉ.मनोहर देशपांडे,संघाचे शहर कार्यवाह हिराकांत रामदासी,महेश मुळे,राहुल गांधी, गायत्री कुलकर्णी आदी उपस्थित होते.                
प्रास्ताविकात डॉ.रविंद्र साताळकर यांनी जनकल्याण समितीच्या कार्याचा आढावा घेताना कोविडच्या पहिल्या फेज मध्ये किराणा कीट,फूड पॉकेट्स,मास्क,सँनेटायझर्स वाटपची सविस्तर माहिती दिली. दुसर्‍या फेज मध्ये विनामुल्य कोविड केअर सेंटर चालू केल्याचे सांगितले.                                
जवाहर मुथा म्हणाले कि,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जनकल्याण समिति आपत्ति काळात नेहमी प्राधान्याने समाजासाठी धावून येते.या कोविड काळात देखील केअर सेंटर चालू करून नगरकरांना दिलासा दिला आहे.त्यात भर म्हणून आज ऑक्सीजन कॉन्सट्रेटरची सेवा उपलब्ध करून दिली ही समाधानाची  बाब आहे.                                                       रामचंद्र श्रोत्री यांनी जनकल्याण समितीच्या कार्याची प्रशंसा करून समाजसेवेप्रती असणारी कटीबद्धता अनुकरणीय असल्याचे विदित केले.                                                                          
जनकल्याण समितिच्या कार्याला सर्वतोपरीने सक्रिय सहकार्य राहील असे के.के.शेट्टी यांनी सांगितले.  केशव माधव कोविड सेंटरचे प्रकल्प प्रमुख राजेश परदेशी यांनी सूत्रसंचलन करताना या सेंटरमध्ये दाखल झालेल्या कोविड बाधितांसाठी आवश्यकता भासल्यास ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर स्वतंत्र कक्षात उपलब्ध राहणार असल्याचे सांगितले.अधिक माहितीसाठी 9890055409, 9850057222, 8208985828 या क्रमांकावर संपर्क साधावा.असे सांगितले.  सहप्रकल्प प्रमुख पी.डी. कुलकर्णी यांनी आभार मानले.        

No comments:

Post a Comment