जामखेड तालुक्यातील लोकांना प्रथम लस दयावी --सामाजिक कार्यकर्ते संजय काका कोठारी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, May 7, 2021

जामखेड तालुक्यातील लोकांना प्रथम लस दयावी --सामाजिक कार्यकर्ते संजय काका कोठारी

 जामखेड तालुक्यातील लोकांना प्रथम लस दयावी --सामाजिक कार्यकर्ते संजय काका कोठारीनगरी दवंडी

जामखेड तालुका प्रतिनिधी

कोरोणा च्या दुस-या  लसीचा डोस घेणे अत्यंत गरजेचे असताना, लसीचा अपुरा पुरवठा लोकांचा जीवघेणा ठरणार आहे. दुसरा डोस घेण्यासाठी लोकांची दिवसेंदिवस येथील ग्रामीण रूग्णालयासमोर होणारी गर्दी चिंतेचा विषय ठरली आहे. अशातच लस घेण्यासाठी केवळ जामखेड तालुक्यातीलच नव्हे तर बाहेर तालुक्यातीलही लोक याठिकाणी येत असल्याने ग्रामीण रूग्णालय प्रशासनावर याचा अतिरिक्त ताण पडला आहे.

      पहिला डोस घेण्यासाठी कुठूनही जामखेड च्या यादीत जिल्ह्यातील आणि दुसऱ्या जिल्ह्यातील लोक येवु लागल्याने   जामखेडकर मात्र वा-यावर अशी स्थिती झाली असल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी व्यक्त केली आहे.

     कोठारी म्हणाले, ज्यांचे पहिला डोस घेवुन बेचाळीस दिवस  झाले आहेत , त्या लोकांना दुसरी लस मिळेल की नाही. या  चिंतेत पडले आहेत.  १८ ते ४४ वयोगटातील लोकांना ऑनलाइन आदेश देण्यात आले परंतु, जामखेड याठिकाणी पुणे,नगर ,कडा,आष्टी ,बीड ,पाटोदा ,शिर्डी, पाथर्डी यासह अनेक ठिकाणच्या लोकांनी जामखेडच्या ग्रामीण रूग्णालयात  नाव नोंदवले आहे. त्यामुळे जामखेडकर या लसीपासून वंचित राहिले आहेत.  याप्रश्री प्रशासनाने ज्या त्या विभागातील ज्या त्या लोकांना येतीलच ग्रामीण रुग्णालयात घेण्यास परवानगी द्यावी तसेच २०० जाणांना लस देण्यात येणार असल्याचे समजले परंतु त्यामध्ये सत्तर-ऐंशी बाहेरचे लोकांचे नाव आहेत.त्यामुळे येथील लोकांच्या लसीकरणावर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here