शरदचंद्र पवार साहेब कोविड सेंटरला पाच लाख किंमतीचे टॉयलेट दिले भेट ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 29, 2021

शरदचंद्र पवार साहेब कोविड सेंटरला पाच लाख किंमतीचे टॉयलेट दिले भेट !

 शरदचंद्र पवार साहेब कोविड सेंटरला पाच लाख किंमतीचे टॉयलेट दिले भेट !

विजयगंगा रूलर मेडीकल फाऊडेशन व ओंकार मल्टीस्पेशेलिटी हॉस्पिटलचा अनोखा उपक्रम !



नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी 

भाळवणी येथील ओंकार हॉस्पिटलचे संचालक डॉ.किरण व डॉ. सौ.तनुजा रोहकले यांचे सामाजिक दायित्व काय आहे हे कोरोनाने दाखवून दिले आहे

       समाजात वैद्यकीय  क्षेत्रात भरीव काम करणारे अनेक डॉक्टर आहेत पण वैद्यकीय सेवेबरोबर सामाजिक बांधिलकी जपणारे खुप कमी आहेत.. आपण समाजाचे देण लागतो या भावनाने आयुष्यभर काम करणारे पण जे काम केले त्या गोष्टीचीही प्रसिद्धी कधीच न मिरवता गोर गरीबांना कायम मदतीचा हात डॉक्टर दांपत्य देत आले आहेत ते म्हणजे भाळवणी मधील ओंकार हाँस्पिटलचे संचालक डॉ. किरण रोहकले व डॉ. तनुजा रोहकले...

गेली अनेक वर्ष हे दांपत्य वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून समाजाची सेवा करत आहेत,, कोरोनाच्या पहील्या लाटेपासुनच हजारो कोरोना रूग्णावर अत्यल्प पैशामध्ये सेवा देत रूग्णाचे प्राण वाचवण्याचे काम करत आहे...

आमदार निलेश लंके साहेबांनी  भाळवणी येथे ११०० बेडचे कोविड सेंटर सुरु केल्यापासून लंके साहेबांच्या खांद्याला खांदा लावुन हे दांपत्य काम करत आहे, मग ती वैद्यकीय मदत असो, आर्थिक असो, वैद्यकीय साहीत्यांचे मदत असो.. 

आमदार लंके साहेबांनी सुरू केलेल्या शरदचंद्र पवार कोविड सेंटरला पाच लाख कीमतीचे टायलेट ह्या दांपत्यानी त्याच्या विजयगंगा रूलर मेडीकल फाऊडेशन व ओकांर मल्टीस्पेशेलिटी हाँस्पिटल संस्थेतर्फ भेट देत परत एकदा सामाजिक बांधिलकीचे दर्शन द्या दांपत्यांनी दीले ,,,,  ह्या कोविड सेंटर मध्ये गंभीर झालेल्या बऱ्याच गरीब रुग्णाना आमदार लंके साहेबांनी डाँक्टर रोहकले यांच्या दवाखान्यात पाठवल,त्या सर्व गरीब रुग्णाना मोफत उपचार देत  त्यां रूग्णांना जिवनदान देण्याच काम या दांपत्याने केले आहे .

No comments:

Post a Comment