जय मल्हार आजी माजी सैनीक ग्रुप देवदैठणच्या वतीने आरोळे कोव्हीड सेंटरला आर्थीक मदत. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 3, 2021

जय मल्हार आजी माजी सैनीक ग्रुप देवदैठणच्या वतीने आरोळे कोव्हीड सेंटरला आर्थीक मदत.

 जय मल्हार आजी माजी सैनीक ग्रुप देवदैठणच्या वतीने आरोळे कोव्हीड सेंटरला आर्थीक मदत.नगरी दवंडी

तालुका प्रतिनिधी 

जामखेड तालुक्यातील देवदैठण येथील देवदैठण वारियर्स जय मल्हार आजी माजी सैनीक ग्रुपच्या वतीने शिवनेरी अॅकेडमीचे कॅप्टन लक्ष्मण भोरे यांच्या हस्ते आरोळे कोव्हीड सेटरला मदत म्हणुन रोख पंचवीस हजार रुपयाची देणगी देण्यात आली तर तालुक्यातील इतर आजी माजी सैनिकांनी सुद्धा शक्य ती मदत करावी असे आव्हाहन कॅप्टन लक्ष्मण भोरे यांच्या वतीने यावेळी करण्यात आले

देशासह संपुर्ण राज्यभर कोरोना या महामारीने थैमान घातले असताना सर्व सामान्य माणसापासून ते धनधांगडयासह सर्वाची चिंता वाढतेय अशा बिकट प्रसंगी जामखेड येथील आरोळे हॉस्पीटलच्या माध्यमातुन कोव्हीड रुगणावर मोफत उपचार केले जात आहेत अशा या सामाजिक बांधीलकी जोपासणाऱ्या रुग्णालयास समाजातील सर्व स्तरातुन सर्वतोपरी मदतीचा ओघ चालु असल्याने येथील हजारो  कोरोना रुग्णाचे प्राण वाचले आहेत त्यासाठी आपल्या माध्यमातुन काही मदत झाली पाहीजे या विचारा पोटी जामखेड तालुक्यातील देवदैठण येथील देवदैठण वारियर्स जय मल्हार आजी माजी सैनीक ग्रुपच्या वतीने व शिवनेरी अॅकेडमीचे कॅप्टन लक्ष्मण भोरे यांच्या संकल्पनेतुन जय मल्हार गुपमधील सुबेदार दिनकर भोरे माजी सैनीक रवी बनकर भाऊसाहेब वाघमारे अशोक पिंगळे संदीप धेन्डे या सर्वाच्या सहयोगातुन एक मे या महाराष्ट्र व कामगार दिनाचे औचीत्य साधून आरोळे कोव्हीड सेंटरला रोख पंचवीस हजार रुपयाची देणगी देण्यात आली हि देणगी हॉस्पीटलचे संचालक रवीदादा आरोळे आरोग्य सेवीका सुलताना भामी यांनी स्विकारुन उपस्थित आजी माजी सैनीकाचे आभार मानले तर सर्वानी मदत करण्याचे आव्हान कॅप्टन भोरे यांनी यावेळी बोलताना केले तर यावेळी जय मल्हार ग्रुपच्या सदस्यासह देवदैठण ग्रामस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here