खासदार डॉ. सुजय विखेंनी साधना करोना रुग्णांशी संवाद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, May 20, 2021

खासदार डॉ. सुजय विखेंनी साधना करोना रुग्णांशी संवाद

 खासदार डॉ. सुजय विखेंनी साधना करोना रुग्णांशी संवादनगरी दवंडी

शिर्डी प्रतिनिधी -

आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या प्रवरा कोव्हीड केअर सेंटरमध्ये खासदार डॉ.सुजयदादा विखे पाटील यांनी रुग्ण, डाॅक्टर आणि नर्सिंग स्टाफशी संवाद साधला. रोज रात्री रुग्णांना लोणी येथील युवा उद्योजक ॠषिकेश तांबे, लक्ष्मीकांत असावा, सिध्दांत मिसाळ ,भूषण विखे ,गणेश खेंडके यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या हळदीच्या दुधाचे वितरण खासदार डॉ.विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. बाभळेश्वर येथील राजेंद्र हिरालाल गदीया व निलेश गदीया यांनी ११ हजार रुपयांया मदतीचा धनादेश खा.डॉ विखे पाटील यांच्याकडे सुपूर्त केला. लक्ष्मणराव नेहे यांच्या तर्फे अकराशे अंडी रुग्णांसाठी देण्यात आली. याप्रसंगी प स माजी उपसभापती बबलू म्हस्के , आशितोष नेहे, संकेत नेहे, डॉ किरण आहेर, डॉ निलेश पारखे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here