वसंतराव झावरे पाटील कोविड सेंटर , प्रियदर्शनी पब्लिक स्कूल , टाकळी ढोकेश्वर येथे सुरू... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 12, 2021

वसंतराव झावरे पाटील कोविड सेंटर , प्रियदर्शनी पब्लिक स्कूल , टाकळी ढोकेश्वर येथे सुरू...

 कोणत्याही प्रकारची जाहिरात न करता केलेली सेवा ही आत्मिक समाधान मिळवून देते... सुजित झावरे पाटील 

वसंतराव झावरे पाटील कोविड सेंटर , प्रियदर्शनी पब्लिक स्कूल , टाकळी ढोकेश्वर येथे सुरू...

कोविड सेंटरमध्ये उपचार घेतला असलेल्या रुग्णांसाठी ह .भ. प. सुनील महाराज सोनवणे यांचे कीर्तनाचे आयोजन..! नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील टाकळी  . वसंतराव झावरे पाटील कोविड सेंटर , प्रियदर्शनी पब्लिक स्कूल , टाकळी ढोकेश्वर येथे सुरू असून त्या ठिकाणी अनेक रुग्ण उपचार घेत असून कुठलाही प्रकारचा गाजावाजा व प्रसिद्धी न करता सदर कोविड सेंटर सुरू केले गेले . आज या कोविड सेंटरमध्ये उपचार घेतला असलेल्या रुग्णांसाठी ह .भ. प. सुनील महाराज सोनवणे यांचे कीर्तनाचे आयोजन केले होते यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे प्रतिष्ठानचे पंचायत समिती सदस्य पती अमोल साळवे, सामाजिक कार्यकर्ते मोहन रोकडे ,खंडोबा देवस्थान विश्वस्त किसनराव धुमाळ, रवींद्र पडळकर, शिवाजीराव खोडदे, स्वप्नील राहिंज, सचिन हांडे, अमित गांधी, यांच्यासह सर्व कार्यकर्ते हजर होते या कोविड सेंटरसाठी अनेक दानशूर व्यक्तीनी औषधे , अन्नधान्य , कोविड रुग्णांसाठी आवश्यक असलेले साहित्य हे मदत म्हणून दिले . एका दानशूर उद्योजकाने ३० बेड मोफत दिले . देवकृपा परिवारातील काही सहकाऱ्यांनी लाखो रुपयांची औषधे देखील दिली . कोविड सेंटरमध्ये मोफत औषधे , दोन वेळचे जेवण , नाष्टा चहा अशी सर्व व्यवस्था मोफत करण्यात आलेली आहे . कोणत्याही प्रकारची जाहिरात न करता केलेली सेवा ही आत्मिक समाधान मिळवून देते असे सुजित झावरे पाटील यांनी सांगितले . टाकळी ढोकेश्वर येथील स्वर्गीय वसंतराव झावरे पाटील कोविड सेंटरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रुग्ण जास्त सिरीयस झाल्यास अहमदनगर शहरातील मॅक्स केअर, सिटीकेअर , डॉ . अक्षय झावरे पाटील हॉस्पिटल , रेणुकामाता हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये येथून येणाऱ्या पेशंटसाठी आरक्षित बेड ठेवण्यात आले आहेत . कोणत्याही प्रकारची मदतीची हाक न देता ही असंख्य कार्यकर्ते याठिकाणी श्रमदान करीत आहेत . येत्या काही दिवसांमध्ये सदर कोविड सेंटरमध्ये विश्वशांती यज्ञ , होम हवन ,  अश्या प्रकारचे रुग्णांना दिलासा देणारे उपक्रम राबविण्यात येणार आहे असे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment