कोरोना ताळेबंदीत राज्यमंत्री बच्चु कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष राहाता व कोपरगाव तालुका वृद्ध आजीबाईस घेणार दत्तक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 31, 2021

कोरोना ताळेबंदीत राज्यमंत्री बच्चु कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष राहाता व कोपरगाव तालुका वृद्ध आजीबाईस घेणार दत्तक

 कोरोना ताळेबंदीत राज्यमंत्री बच्चु कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष राहाता व कोपरगाव तालुका वृद्ध आजीबाईस घेणार दत्तक



नगरी दवंडी

शिर्डी शहर प्रतिनिधी : 

श्रीमती मंगलाबाई कारभारी आहेर मौजे करंजी बु. ता कोपरगाव, जिल्हा अहमदनगर या साठ वर्षाच्या अनाथ आदिवासी समाजाच्या आजीबाई आहेत. कोरोना ताळेबंदीमध्ये या आजीबाई अत्यंत भयावह बिकट परिस्थितीमध्ये जीवन जगत आहे. राहायला घर नाही तसेच खायला दोन वेळचे जेवण नाही आणि मुले-बाळे नसल्याने कोणाचा आधारही नाही. सध्या ही महिला निवाऱ्या-अभावी मंदिरात वास्तव्य करून आपला गुजारा करत आहे. अशा निराधार आजीबाईची परिस्थिती जाणून घेऊन आज प्रहार जनशक्ती पक्ष कोपरगाव व राहाता तालुका यांच्या वतीने सदर महिलेस किराणा माल तसेच जीवनावश्यक वस्तू यांच्या किट दिल्या आहेत. यावेळी जिल्हा संघटक अभिजित कालेकर, जिल्हा सरचिटणीस अभिजित पाचोरे, जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे, कोपरगाव प्रहार जनशक्ती पक्ष तालुकाध्यक्ष संदीप क्षीरसागर, राहाता तालुकाध्यक्ष दिनेश शेळके, कोपरगाव तालुका पदाधिकारी परमेश्वर कराळे, नितीन किपायले, शरद खिलारी, दिपक पठारे, प्रवीण भुजाडे, प्रमोद आरोटे, आमीन शेख, भरत जगताप, सुनील जाधव, विश्वास जाधव, उत्तम भिंगारे, हौशीराम जाधव, संजय जाधव, राहाता तालुका पदाधिकारी वसंतराव काळे, जगणं सरोदे, नितीन भन्साळी, रोमचंद कडू, अविनाश सनासे, सुधाकर डांगे, अमोल कडू यांच्या अथक प्रयत्नातून हे नियोजन करण्यात आले आहे. कोरोना ताळेबंदी मध्ये कोपरगाव व राहाता तालुका सर्व प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी या आजीबाईसाठी दोन वेळ जेवण तसेच राहण्यासाठी निवाऱ्याची व्यवस्था करून देत आहेत. कोरोना महामारीच्या काळात एक प्रकारे प्रहार कडून या आजीबाईस दत्तकचं घेण्यात आले आहे. समाजातील दानशूर व्यक्तींना या वृद्ध आजीबाईस मदत  करण्याची आर्त हाक प्रहार कडून व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment