मुंबईतील शिक्षकांचाही लंके यांच्या कोविड सेंटर साठी मदतीचा हात ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 4, 2021

मुंबईतील शिक्षकांचाही लंके यांच्या कोविड सेंटर साठी मदतीचा हात !

 मुंबईतील शिक्षकांचाही लंके यांच्या कोविड सेंटर साठी मदतीचा हात !नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी : 

पारनेर तालुक्याचे लाडके आमदार श्री निलेश लंके साहेब यांनी सुरू केलेल्या भाळवणी येथील कोविड सेंटर साठी मुंबईतील पारनेर तालुक्यातील सर्व शिक्षक श्री किसनराव पावडे साहेब व श्री भाऊसाहेब आहेर सर याच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येऊन तमाम शिक्षकांनी आपापल्या परीने  मदत पाठवली आणि तब्बल 60 000  रूपये देणगी स्वरूपात निधी जमा झाला सदर निधी निलेश लंके प्रतिष्ठाण ला जमा करण्यात आला 

  यासाठी खऱ्या अर्थाने श्री आहेर सर ,पावडे सर ,नवले सर ,पानमंद सर,पवळे सर ,औटी सर, रोहकले सर, रोकडे सर , जनार्धन औटी सर,रासकर सर ,जमाल सर ,शेंडकर सर ,वाफारे मॅडम ,घुले मॅडम ,आवारी मॅडम तसेच इतरही सर्व पारनेरकर शिक्षकांनी योगदान दिले व भरघोस निधी पाठविण्यात आला यापुढेही अशा कोणत्याही कामासाठी आम्ही सदैव तत्पर राहून मदत करू असे सांगितले  

      तसेच काही बुजुर्ग शिक्षकांनी वडीलकीचा सल्ला देताना सांगितले की साहेब तालुक्यातील जनतेला तुमच्या सारख्या नेतृत्वाची गरज आहे म्हणून तुम्ही देखील तुमची काळजी घ्या

    आणि आपण मुंबईकर मंडळींना दिलेल्या शब्दाची खऱ्या अर्थाने पूर्तता केली  याचा आनंद व्यक्त करत आमदार साहेबांच्या या कार्यासाठी भरभरून मनपूर्वक शुभेच्छा दिल्या .


No comments:

Post a Comment