औरंगाबाद महामार्गावर रूग्णवाहिका, ऑक्सिजन वाहतूक करणार्‍या वाहनांना मोफत इंधन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 31, 2021

औरंगाबाद महामार्गावर रूग्णवाहिका, ऑक्सिजन वाहतूक करणार्‍या वाहनांना मोफत इंधन

 औरंगाबाद महामार्गावर रूग्णवाहिका, ऑक्सिजन वाहतूक करणार्‍या वाहनांना मोफत इंधन

नेवासा फाटा येथील जिओ बी.पी.(रिलायन्स) राज पेट्रोलपंपावर प्रांताधिकार्‍यांच्या हस्ते शुभारंभ


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः कोरोना काळात ऑक्सीजन वाहतूक करणारे वाहन व कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी घेऊन जाणार्या रूग्णवाहिकांना मोफत इंधन मिळणार आहे. नगर-औरंगाबाद महामार्गावरुन जाणार्या वाहनांना ही सुविधा मिळणार आहे. जिओ बी.पी. (रिलायन्स) कंपनीने हे दातृत्त्व दाखवले आहे. नेवासा फाटा येथील रिलायन्सच्या राज पेट्रोलियम येथे या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला असून नोंदणीकृत खासगी किंवा शासकीय रूग्णवाहिका, ऑक्सिजन वाहतूक करणार्या वाहनांना याठिकाणी प्रत्येकी 50 लिटर पेट्रोल किंवा डिझेल मोफत दिले जाणार आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ नगरचे प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, नेवासाचे प्रांताधिकारी गणेश पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी न्यायाधीश विकास बडे, नेवाशाचे तहसीलदार रूपेश सुराणा, वैद्यकीय अधीक्षक डॉ.मोहसीन बागवान, तालुकावैद्यकीय अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी, कंपनीचे एरिया मॅनेजर जयप्रकाश दास, हंडीनिमगावचे सरपंच अण्णापाटील जावळे, माका गावचे सरपंच सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक नाथा घुले, पेट्रोलपंपाचे संचालक अभिजीत घुले, मॅनेजर संदीप नारळे आदी उपस्थित होते.
प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, गणेश पवार यांनी जिओ बी.पी.कंपनीच्या या उपक्रमाचे कौतुक करून करोना काळात मानवतेच्या दृष्टीकोनातून केलेली ही मदत लाखमोलाची असल्याचे सांगितले.
अभिजीत घुले यांनी सांगितले की,  नगर-औरंगाबाद मार्गांवरून कोविड रूग्णांना घेवून  जाणार्या सर्वच रुग्णवाहिका, ऑक्सिजन वाहतूक करणार्या नोंदणीकृत वाहनांना या उपक्रमाचा फायदा होणार आहे जिल्हा प्रशासन अथवा जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाचे पत्र सादर करणार्या नोंदणीकृत खासगी किंवा सरकारी रुग्णवाहिका व ऑक्सिजन वाहतूक करणारे वाहने या योजनेसाठी पात्र ठरणार आहे.
जयप्रकाश दास यांनी कंपनीने देशभरात सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम सुरु केल्याचे सांगत जास्तीत जास्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

No comments:

Post a Comment