तोफखान्यातील एकही नागरिक लसीकरणापासून वंचित राहणार नाही - अॅड. धनंजय जाधव
लसीकरणात सुसूत्रता आणण्यासाठी गणेश मंडळांकडून नवीन प्रयोग
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग एक व्यक्ती पासून अनेक व्यक्तींना होण्याची भीती मोठ्या प्रमाणात आहे. आपण गेल्या 1 वर्षा पासून कोरोना आजाराच्या वेदना सहन करत आहे. दुर्दैवी आपले काही जिवाभावाचे मित्र आपल्याला सोडून गेले आहे.त्यातच कोरोनाची प्रतिबंध लस घेण्यासाठी आरोग्य केंद्रावर गर्दी उसळत आहे. या गर्दीमुळे पुन्हा कोरोना चा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे,यासाठी तोफखाना भागामधील गणेश मंडळानां एकत्रित करून सर्व नागरिकांचे नावे संकलन करण्यास सांगितले.
या सर्व कामांमध्ये 25 गणेश मंडळांनी सहभाग नोंदवला असून,लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ नये यासाठी नवीन उपाययोजनांची शक्कल लढवण्यात आली,प्रत्येक गणेश मंडळाचा लकी ड्रॉ द्वारे नंबर कडून त्या तारखेला त्या भागातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे त्यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही या योजनेच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यास मदत होईल असे प्रतिपादन मा.नगरसेवक ड.धनंजय जाधव यांनी व्यक्त केले.
अॅड.धनंजय जाधव पुढे बोलताना म्हणाले की, तोफखान्याच्या आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. शहरासह शहराबाहेरील लोक या लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी येत असल्यामुळे तोफखाना भागातील नागरिक लसीकरणापासून वंचित राहात आहे.तोफखाना हा दाटीवाटीने राहणारा रहिवासी परिसर आहे. या भागांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करून लसीकरणाचे जास्त डोस मागून घेतले जाणार आहे. या लसीकरणा मध्ये 45 वर्षापुढील नागरिकांना प्राधान्य देऊन या भागातील सर्व नागरिकांचे मंडळाच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने लसीकरण करण्यात येणार आहे. हे नियोजन मंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यासाठी तोफखाना भागातील 25 मंडळांनी सहभाग नोंदवला आहे.
मा.नगरसेवक अॅड.धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून लसीकरणाच्या नियोजनासाठी लसीकरण केंद्रावर सुसूत्रता आणण्यासाठी तोफखाना भागातील 25 गणेश मंडळाच्या पदाधिकार्यांची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मा.उपमहापौर दीपक सूळ,सारंग पंधाडे,कैलास शिंदे,राजेंद्र विद्ये,राजेंद्र बोगा, गणेश झिंजे,चेतन आरकल, संतोष दोमल,महेश सब्बन, अभिजीत चीप्पा,निलेश गाडेकर, सुमित रच्चा,अमोल गवते,शिवदत्त पांढरे,गौरव परदेशी,राहुल गुंडू, कुणाल दुडगू,आशिष रंगा, प्रशांत घोसके,रवी वाघास्कर, हर्षल चिलका,विजय सामलेटी,निलेश गोंधळे,नदीम शेख,बन्सी बीद्रे,दीपक जाट,ललित बोरा,ऋषी गुंडला,अजय सासवडकर,प्रश्नत मडके,नितीन कामुनी,आदी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment