मांडवे गावात दहा दिवसांचा जनता कर्फ्यू - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, May 20, 2021

मांडवे गावात दहा दिवसांचा जनता कर्फ्यू

 मांडवे गावात दहा दिवसांचा जनता कर्फ्यू

नागरिकांनी खबरदारी घ्यावी-
मांडवे गावामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी. ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आदेशाचे काटेकोर पालन करावे व ग्रामपंचायतीस सहकार्य करावे. मांडवे गाव लवकरच कोरोना मुक्त करण्यात येईल. - सुभाष निमसे 
सरपंच, मांडवे

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर तालुक्यातील मांडवे येथे कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बुधवार ( दि. 19)पासून ते शनिवार (दि. 29) पर्यंत ग्रामपंचायतीने  जनता कर्फ्यू पुकारला आहे. या अंतर्गत कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत,, अशी माहिती सरपंच सुभाष निमसे यांनी दिली.
 मांडवे गावामध्ये गेल्या काही  दिवसांपासून कोरोनाचा  प्रादुर्भाव वाढला आहे. सद्यस्थितीत सक्रीय रुग्णांची संख्याही काळजी  वाढविणारी आहे. दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे.
     कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतीने गावामध्ये जनता कर्फ्यू पुकारला आहे. जनता कर्फ्यू दरम्यान नागरिकांनी सर्व आदेशाचे पालन करण्याचे आवाहन सरपंच सुभाष निमसे, उपसरपंच संजय रामदास निमसे, ग्रामपंचायत सदस्य शाम निमसे, संतोष निमसे, अरुण निमसे, प्रकाश निकरड, मनोज गागरडे , महेंद्र निकरड, दिलीप निकरड व ग्रामपंचायत प्रशासनाने  केले आहे. गावातील सर्व रस्ते बांबू लावून बंद करण्यात आले आहेत. वैद्यकीय सेवा, मेडिकल पूर्ण वेळ, घरपोच गॅस वितरण सेवा, सर्व मान्यताप्राप्त आर्थिक आस्थपना ( बँक, पतसंस्था, सेवा सोसायटी ), दूध व दुग्ध जन्य पदार्थ खरेदी व विक्री सकाळी 7 ते 8 सुरू राहणार आहे.तर, किराणा दुकाने, भाजीपाला, फळे, चिकन, अंडी, मटण, इतर मांसाहारी पदार्थ खरेदी व विक्री, सर्व खासगी आस्थपना बंद राहणार असून  खाद्यपदार्थ फेरीवाले यांना मनाई करण्यात आली आहे.मांडवे ग्रामपंचायतीने जनता कर्फ्यू पुकारण्याचा घेतलेल्या निर्णयाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here