राज्यातील लॉक डाऊन आणखी वाढणार का! वाचा सविस्तर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 11, 2021

राज्यातील लॉक डाऊन आणखी वाढणार का! वाचा सविस्तर

 राज्यातील लॉक डाऊन आणखी  वाढणार का! वाचा सविस्तर



नगरी दवंडी

मुंबई  - राज्यातील लॉकडाऊन 15 मे नंतरही कायम राहण्याची शक्यता आहे. कोरोनाची रुग्ण संख्या अजूनही कमी झालेली नाही. दररोज होणारी मोठी वाढ कायम आहे. त्यामुळे राज्यात आणखी १५ दिवस लॉकडाऊन वाढू शकतो. 

बुधवारी कॅबिनेट बैठकीमध्ये लॉकडाऊनबाबत निर्णय होणार असल्याची माहिती मिळते आहे. अनेक जिल्ह्यात अजूनही कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे 30 मेपर्यंत हेच निर्बंध कायम राहणार असल्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्रात मुंबईत कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरी अनेक जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा दर वाढताना दिसतो आहे. त्यामुळं लॉकडाऊन कायम राहणार अशी शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लॉकडाऊनबाबत निर्णय घेतील अस काही दिवसांपूर्वी राज्याच्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं होता. बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. त्यामुळे या बैठकीत लॉकडाऊन वाढवण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

राज्यात दररोज वाढणाऱ्या रुग्णांची संख्या अजूनही 50 हजारांच्या आसपास आहे.  राज्याचा पॉझिटिव्ह रेट कमी झालेला नाही. काही जिल्ह्यात कोरोनाचा वाढता दर कायम आहे. काही शहरात आता कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.

राज्यात रुग्णवाढीला थोडासा ब्रेक लागला असला तरी संकट कायम आहे. दुसऱ्या लाटेत मृत्यूदर वाढला आहे. त्यामुळे चिंता कायम आहेत.

No comments:

Post a Comment