कान्हूरपठार अरोग्य उपकेंद्रात परिचारीकांचा केला सन्मान, - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 14, 2021

कान्हूरपठार अरोग्य उपकेंद्रात परिचारीकांचा केला सन्मान,

 कोरोनाच्या साथ रोगात ' नर्स ' चे योगदान मोलाचे - उज्वला ठुबे 

कान्हूरपठार अरोग्य उपकेंद्रात परिचारीकांचा केला सन्मान,

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघानी जपली सामाजिक बांधिलकी



नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

गेल्या वर्षभरापासुन भारतासह जगात थैमाण घालणाऱ्या कोरोना आजाराच्या साथीमध्ये नर्सेस (परिचारिका ) यांचे योगदान मोलाचे आसुन त्यांचे कार्याचे कौतुक होणे अवश्यक असल्याचे मत जिल्हा परिषद सदस्या उज्वला ठुबे यानी व्यक्त केले .

पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील अरोग्य उपकेंद्रात जागतिक परिचारिका दिनाचे निमित्ताने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पारनेर शाखेच्या वतीने संपर्क प्रमुख संजय मोरे यांच्या उपस्थित परिचारीकाच्या सन्मान सोहळ्याचे अयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी त्या बोलत होत्या .

या वेळी वैद्यकिय आधिकारी डॉ शितल शिंदे परिचारिका आर एस देशमाने परिचारिका सुनिता दारोळे / जगताप , श्रीमती चतुर एस.बी . श्रीमती .आंधळे के .आर .नंदा मायकरे, श्रीमती ए .एन. येवले , व्हि .एच . म्हसके , बी .टी . जाधव , बी .एन लकडे एस .आर . लोंढे . आकाश चंदेल , माजी सरपंच बाळकृष्ण झावरे

ग्रामविस्तार अधिकारी सोनवणे भाऊसाहेब    

कान्हूरपठार ग्राम पंचायत कोरोना योध्दा शशिकांत साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.

उज्वला ठुबे पुढे बोलताना म्हणाल्या की जगावर कोरोना संकट आल्यानंतर आरोग्य सेवेतील डॉक्टरासोबत नर्सनेही कोरोनाच्या साथीचा ढाल बनुन  मुकाबला केला त्या सर्व नर्सेसना सलाम करून त्यांचे कामाचे कौतुक करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने जागतिक परिचारिका दिनी त्यांचा केलेला गौरव अभिमानास्पद आहे 

या पुढील काळात अरोग्य कर्मचाऱ्यानाही   काम करण्यास हुरुप येईल .

डॉ . शितल शिंदे म्हणाल्या वैद्यकिय क्षेत्रात काम करत असताना आम्ही सेवेचा धर्म स्विकारला आसुन रुग्णामध्ये देव पाहुनच आम्ही काम करतो मात्र आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने आमचा गुणगौरव केला आमचे कौतुक केले त्यामुळे पुढील काळात काम करण्यास निश्चित उर्जा मिळेल 

सिस्टर सुनिता दारोळे / जगताप यावेळी बोलताना म्हणाल्या की लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या राज्य मराठी पत्रकार संघाच्या माझ्या सर्व भावानी आमचा सत्कार केला हा आमच्या नोकरीच्या काळातील सर्वात आनंदाचा क्षण असेल .

श्रीमती आर एस  देशमाने, एं .एन  येवले यांनी ही पत्रकार बांधवाचे आभार मानले .

प्रस्ताविकात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पारनेर तालुका संपर्क प्रमुख पत्रकार संजय मोरे यानी संघटनेने राबविलेल्या विविध उपक्रमाची माहीती देऊन जागतिक परिचारिका दिनाच्या सत्कार सोहळ्याचे महत्त्व विषद केले 

कान्हुर पठार ग्राम पंचायतचे वरिष्ठ लेखणीक प्रथम कोरोना योध्दा शशिकांत साळवे यानी उपस्थितांचे आभार मानले.


[ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने जपली सामाजिक बांधिलकी .....

संघटनेची पारनेर तालुक्यात स्थापणा झाल्यानंतर संघटनेचे जिल्हा सचिव व पारनेर तालुका अध्यक्ष दत्ता गाडगे यांच्या मार्गदर्शना खाली गेले दोन वर्ष विविध उपक्रम राबविले यामध्ये पोलिस , महसुल , आरोग्य कर्मचारी मास्क , सॅनिटायझर वाटप जेवण नाष्टा याची व्यवस्था तर कोरोना काळात चांगली सेवा बजावणाराना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित केले तर अनेक रूग्णाना बेड व आरोग्य सुविधा मिळवुन देण्याचे काम करत सामाजिक बांधिलकी जोपासल्याबददल संघाचे विविध स्थारातुन कौतुक होत आहे ]

No comments:

Post a Comment