बेलवंडी ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्यासाठी उपोषण... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, May 28, 2021

बेलवंडी ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्यासाठी उपोषण...

 बेलवंडी ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्यासाठी उपोषण...श्रीगोंदा प्रतिनिधी :  

तालुक्यातील बेलवंडी गाव हे मोठया लोकवस्तीचे व बाजारपेठेचे गाव असुन गावात पिण्याच्या पाण्याची भिषण पाणी टंचाई आहे. पाण्याचे सर्व उद॒भव कोरडे पडले आहे. सध्या कुकडीचे आवर्तन सुटले असुन पिण्याच्या पाण्यासाठी वेळोवेळी ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार करूनही पिण्यासाठी पाणी सोडले जात नसल्याने ग्रामस्थांनी श्री. भैरवनाथ महाराज मंदीर बेलवंडी येथे पिण्याच्या पाण्यासाठी उपोषण सुरू केले आहे.

                  बेलवंडी गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सुटणेकरीता २०१७ साली महाराष्ट्र जिवन प्राधिकरण यांचेकडे चिंचणी तळ्यावरून बेलवंडीसाठी बंदीस्त पाईपद्वारे पाणी पुरवठा योजना प्रस्तावित आहे. २०१७ पासून वेळोवेळी सदर योजना मंजुरीकरिता पाठपुरावा करून व वेळोवेळी बदलत्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र जिवन प्राधिकरण येथे संबंधित योजनेचे कागदपत्रे दाखल करून अद्याप ही योजनेबाबत कार्यवाही झाली नाही. गावात पिण्याच्या पाण्याची भिषण पाणी टंचाई आहे. पाण्याचे सर्व उद॒भव कोरडे पडले आहे. सध्या कुकडीचे आवर्तन सुटले असुन पिण्याच्या पाण्यासाठी वेळोवेळी ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार करूनही पिण्यासाठी पाणी सोडले जात नसल्याने ग्रामस्थांनी श्री. भैरवनाथ महाराज मंदीर बेलवंडी येथे पिण्याच्या पाण्यासाठी उपोषण सुरू केले आहे. तसेच महाराष्ट्र जिवन प्राधिकरण यांचेकडे प्रस्तावित असलेली पाईपद्वारे पाणी पुरवठा योजना मंजूर न झाल्याने ग्रामस्थ दिनांक ०३ जून रोजी महाराष्ट्र जिवन प्राधिकरण कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याची माहिती सरपंच सौ. सुप्रिया पवार यांनी यावेळी दिली.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here