काँग्रेसचे मयुर पाटोळे यांच्या टीकेनंतर नगरसेवक खडबडून जागे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, May 18, 2021

काँग्रेसचे मयुर पाटोळे यांच्या टीकेनंतर नगरसेवक खडबडून जागे

 काँग्रेसचे मयुर पाटोळे यांच्या टीकेनंतर नगरसेवक खडबडून जागे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः
प्रभाग 7 नागापूर - बोल्हेगाव मध्ये ठराविक नगरसेवकच काम करतात. तर काही नगरसेवक हे जनतेच्या संपर्कात नाही, ते कुठल्या बिळात जाऊन बसले आहेत? ज्या नगरसेवकांनी निवडणुकीच्या वेळी मतदारांना प्रलोभन दाखवून बूथवर जाण्या-येण्यासाठी रिक्षा करून दिला होत्या, त्यांनी तशीच व्यवस्था या महामारीच्या कठीण परिस्थितीत रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालय व लसीकरण केंद्रापर्यंत येण्या-जाण्यासाठी करावी असे विधान युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे यांनी केले होते.
सदर बातमी वर्तमान पत्रातून प्रसिद्ध होताच स्थानिक नगरसेवक दुसर्‍याच दिवशी खरबडून जागे झाल्याचे दिसून आले. शिवसेना नगरसेवक अशोक बडे व दत्ता सप्रे हे तत्परतेने जनतेचे प्रश्न हाती घेताना पहायला मिळाले.
यावर पाटोळे यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी म्हंटले आहे, आदरणीय नगरसेवक श्री. अशोक बडे व श्री. दत्ता सप्रे ह्या दोन्ही नगरसेवकांनी माताजी नगर पाण्याच्या संदर्भात व प्रभागातील नालेसफाई हे दोन अतिमहत्त्वाचे मुद्दे हाती घेतले आहेत. त्याबद्दल त्यांचे आभार व अश्याच पद्धतीने त्यांनी येथून पुढच्या काळात प्रभागातील विकासाच्या दृष्टीने कटिबध्द असावे फक्त विरोध करणे किव्हा टिक्का करणे हाच केवळ उदेश नाहीय, ही वेळ राजकारण करण्याची नाहीये, अशी भावना व्यक्त केली. तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी मजबूत आवाज म्हणून कायम मी उभा असेल असे देखील आवर्जून सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here