डॉ. एस.टी.महाले मंगल कार्यालयात लसीकरण केन्द्र सुरु करावे किशोर डागवाले यांची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, May 22, 2021

डॉ. एस.टी.महाले मंगल कार्यालयात लसीकरण केन्द्र सुरु करावे किशोर डागवाले यांची मागणी

 डॉ. एस.टी.महाले मंगल कार्यालयात लसीकरण केन्द्र सुरु करावे

किशोर डागवाले यांची मागणीनगरी दवंडी

नगर - रंगारगल्ली येथील महानगरपालिकेच्या डॉ. एस.टी.महाले मंगल कार्यालयात मनपाने त्वरित करोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरु करावे, अशी मागणी भाजपाचे जेष्ठ नेते माजी नगरसेवक किशोर डागवाले यांनी मनापा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हंटले आहे की, एस.टी.महाले मंगल कार्यालय हे शहराच्या मध्यवस्तीत आहे. या परिसरात मोठया प्रमाणात लोकवस्ती असल्याने सदर भागातील नागरीकांना इतरत्र असलेल्या लसीकरण केन्द्रावर ये-जा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. शहरात होत असलेले लसीकरण केंद्र लहान जागेत असल्याने तेथे खुप मोठया प्रमाणात नागरिकांची गर्दी होऊन करोनाचे संक्रमन पसरण्याची दाट शक्यता आहे. याउलट डॉ. एस.टी. महाले मंगल कार्यालय मोठया जागेत आहे तसेच याठिकाणी पार्किंगसाठीही मोठी जागा उपलब्ध आहे.

लसीकरणाकरीता येणा-या नागरीकांसाठीही कार्यालयाच्या आतमध्ये थांबण्यास मोठी जागा आहे. याठिकाणी लसीकरण केन्द्र सुरु केल्यास नागरीकांची चांगली सोय होवून गैरसोय दुर होऊन कोरोनाचे संक्रमण रोखण्यास मदत होईल. तरी मनपाच्या आरोग्य विभागास योग्य ते आदेश देऊन तातडीने डॉ. एस.टी. महाले मंगल कार्यायल येथे करोना प्रतिबंधक लसीकरण केन्द्र सुरु करावे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here