कोविड सेंटर नव्हे हे तर गोकुळ..- व्याख्याते गणेश शिंदे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 12, 2021

कोविड सेंटर नव्हे हे तर गोकुळ..- व्याख्याते गणेश शिंदे

 कोविड सेंटर नव्हे हे तर गोकुळ..- व्याख्याते गणेश शिंदे 

पॉझिटिव्ह विचारांचे नेतृत्व असले की जनतेतला कोरोना सहज निगेटिव्ह करता येतो ...!



नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

भाळवणी येथे आमदार निलेश लंके यांनी उभे केलेल्या शरदचंद्रजी पवार कोव्हीड सेंटरला व्याख्याते गणेश शिंदे यांनी भेट दिली. निलेश लंके यांनी अशा परिस्थितीत रुग्णांना प्रेरणा मिळावी त्यांनी सकारात्मक विचार करावा यासाठी व्याख्याते गणेश शिंदे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. आपल्या व्याख्यानातून गणेश शिंदे यांनी रुग्णांना सकारात्मक दृष्टीने या परिस्थितीला सामोरे जाण्याचे आव्हान केले. कोव्हिड सेंटरमध्ये आल्यावर तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता आणि काही पेशंट भजनात तल्लीन होऊन नाचत होते. ही परिस्थिती पाहून लंके साहेब आपण तर येथे गोकुळ उभे केले आहे,अशा शब्दात गणेश शिंदे यांनी निलेश लंके यांच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले कोरोना रुग्णां सोबत इथे झोपणारा आमदार. त्यांच्या सेवेसाठी झोकून देणारे हे नेतृत्व येणाऱ्या काळात नवे राजकीय आदर्श निर्माण करेल असा विश्वास वाटतो. पॉझिटिव्ह विचारांचे नेतृत्व असले की जनतेतला कोरोना सहज निगेटिव्ह करता येतो याचा आदर्श पारनेर ने राज्यभर निर्माण केला.असंख्य कार्यकर्त्यांची सेवाभाव वृत्ती या कामात आपलं योगदान देत आहे.सत्ता संपत्ती व शस्त्र चंचल आहे त्याचा योग्य वेळी योग्य कारणासाठी वापर करणे याचे शहाणपण ज्या नेतृत्वाला समजले त्यांचीच इतिहासाने नोंद ठेवली आहे.

 आपण स्वतःची काळजी घेत इतरांना आधार द्यावा अशी अपेक्षा गणेश शिंदे यांनी व्यक्त केली. या पुढेही सातत्याने रुग्णांना प्रेरणा मिळावी या साठी मी माझ्या परीने प्रयत्न करत राहणार असल्याचे ही शिंदे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment