गरीब कुटुंबांना किराणा वाटप श्री योग वेदांत सेवा समितीचा उपक्रम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 18, 2021

गरीब कुटुंबांना किराणा वाटप श्री योग वेदांत सेवा समितीचा उपक्रम

 गरीब कुटुंबांना किराणा वाटप श्री योग वेदांत सेवा समितीचा उपक्रम  


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर - सतत वाढत असलेले लॉकडाउन घराबाहेर पडण्याची सोय नाही. डोक्यावर छप्पर नाही. रस्त्याच्या कडेला पालावर राहणारे असे अत्यंत हालाकीच्या परीस्थीतीत अनेक कुटुंब आहेत. महामारीच्या काळात अनेकांसमोर रोजी -रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत जायचे कुठे खायचे काय असा प्रश्न हातावर पोट असणा-याना भेडसावतो आहे. हीच गरज लक्षात घेऊन श्री योग वेदांत सेवा समितीने कल्याण रोडवरील अत्यंत हालाकीच्या परीस्थीतीत असलेल्या कुटुंबांना किराणा वाटप केले. कल्याणरोड येथे आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून अभय गर्भे हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेवा समितीचे सुनिल भराट हे होते.उपस्थितांचा परिचय आणि कार्यक्रमाचे स्वरूप दत्ता वामन यांनी सांगितले.अध्यक्ष स्थानांवरून बोलताना अभय गर्भे म्हणाले ‘जे का रंजले गांजले तयासी म्हणे जो आपुले,देव तेथेची जाणावा’ हीच ईश्वर सेवा आहे. संतांची हीच शिकवण आहे. म्हणून प्रत्येकाने आपापल्या परीने मदत केली पाहिजे. मदतीसाठी पुढे आले पाहिजे.प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सुनिल भराट म्हणाले अन्नदान सर्व श्रेष्ठ दान आहे.  गरजवंतांना मदत करणे पुण्य आहे. श्री योग वेदांत सेवा समितीने किराणा देण्याचे ठरवले आणि आज याचे वाटप झाले. तांदुळ, साबण, साखर, चहा, तेल, मीठ, पाण्यासाठी माठ, टोपी अश्या अनेक रोज लागणर्‍या वस्तूंचा समावेश या किराणा किट मध्ये केला आहे. अभय गर्भे सुनिल भराट, गर्भे माताजी यांचे हस्ते गरीब कुटुंबांना उपयोगी वस्तुंचे वाटप केले. अनेक कुटुंबांनी या मदतीचा लाभ घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमित गर्भे, ओमप्रकाश जाधव, अभीषेक भराट, अनुराधा मुंडे, अभिषेक ढाकणे, आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment