चिमुकल्या आदित्य शेळके ने सायकलसाठीसा साठवलेला गल्ला दिला कोविड रुग्णांसाठी.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, May 26, 2021

चिमुकल्या आदित्य शेळके ने सायकलसाठीसा साठवलेला गल्ला दिला कोविड रुग्णांसाठी..

 चिमुकल्या आदित्य शेळके ने सायकलसाठीसा साठवलेला गल्ला दिला कोविड रुग्णांसाठी..

जिल्हा परिषदेचे  मा.सभापती श्री.बाबासाहेब तांबे यांनी केले कौतुक.. 
नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

मोडेल व्हिलेज गोरेगाव येथील आदित्य बाबासाहेब शेळके या  चिमूकल्याने आपल्या वाढदिवसाला सायकल घेण्यासाठी जमवलेला गल्ला रुपये पंधरा हजार आज कोविड रुग्णांसाठी दिला.आपण नंतर घेऊ सायकल आपली माणसं बरी झाली पाहिजेत.सगळे रुग्ण संपले पाहिजेत.या बालवयात कुठून येते इतकी संवेदनशीलता आज कालची पिढी ती जपतेय याचं नवल आहेच.पण हा सांस्कृतिक ठेवा जपला जातोय याचा आनंद आहे.त्याचे पालक श्री.बाबासाहेब शेळके हे देखील महाराष्ट्र पोलीस दलात शेवगाव येथे कार्यरत आहेत.आदित्यला गावा बद्दल अतिशय आपुलकी आणि लोकांबद्दल जिव्हाळा असल्याचे आई स्वाती यांनी सांगितले. या उपक्रमाचे सरपंच सौ.सुमन तांबे,जिल्हा परिषदेचे  मा.सभापती श्री.बाबासाहेब तांबे यांनी कौतुक केले तसेच आदित्य यास वाढदिवसा निमित्त आशीर्वाद दिले.आदित्य शेळके हे सामाजिक कार्यात सातत्याने नवं नवीन उपक्रम राबविणारे दिशा फौंडेशन चे अध्यक्ष संदीप तांबे यांचे भाचे आहेत.

या पैशातून आदित्य च्या पालकांनी मॉडेल व्हिलेज गोरेगाव कोविड सेंटर साठी पन्नास स्टीमर (मशीन),दोन टेम्प्रेचर गन,मॅक्सी गोळी च्या 30 स्ट्रिप (vitamin C & zinc) या वस्तू कोविड सेंटर ला पोहोच केल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here