कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रविण दरेकर आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 4, 2021

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रविण दरेकर आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

 कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रविण दरेकर आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर नगरी दवंडी

नगर, दि. ४ मे - राज्यात कोरोना विषाणूच्या साथीने थैमान घातले आहे. सध्या राज्यात आरोग्य व्यवस्थेमधील असणारी स्थिती आणि कोरोना संकट अत्यंत बिकट परिस्थितीला जन्म घालत असून राज्यात औषध, ऑक्सीजन अभावी अनेक लोकं जीव गमावू लागले आहेत. कोरोना काळात औषधांचाही काळाबाजार होत आहे. या सर्व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन काही दिवसांपासून राज्याचे दोन्ही विरोधी पक्ष नेते आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी राज्याभर दौरे करत आहेत. आतापर्यंत नाशिक, पालघर आणि अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी दौरा केला आहे. त्याचाच भाग म्हणून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी नगर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली असून जिल्ह्यात रुग्णाचा वाढता दर पाहता यंत्रणा अधिक गतीमान व सक्षम करण्यासाठी दरेकर यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व आयुक्तांना सुचना दिल्या असल्याचे दरेकरांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. 

दरेकर म्हणाले की, कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन आरोग्य व्यवस्थेमधील बेडस, वेंटीलेटर, आयसीयू बेडस, रेमडेसिवीर आणि औषध साठा या संदर्भात आकडेवारी घेत संपूर्ण माहिती प्रशासनाकडून घेतली आहे.   राज्यातील परिस्थिती पाहता सध्यातरी नगर येथील आरोग्य व्यवस्थेमध्ये जास्त कमतरता नाही. परंतु ऑक्सीजनचा १० मॅट्रिक टन साठा कमी असून रेमडेसेवीरची जास्त आवश्यकता आहे. सरकार आणि कंपन्यांशी बोलून सर्वाधिक रेमडेसेवीर आणि ऑक्सीजन साठा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी शासनाला कळवू असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

केंद्राने साठा उपलब्ध केला असून, राज्यसरकार टीका करत आहे. तसेच लसीकरण सर्वात जास्त महाराष्ट्राने केलं असताना केंद्राने लसी उपलब्ध करून दिल्या असल्याचा विसर राज्यसरकारला पडला असावा.   केंद्राकडून १७५० मॅट्रिक टन ऑक्सीजन साठा मिळत आहे, तसेच ४ लाख ३५ हजार रेमडेसेवीर मिळत आहे.  परंतु राज्यसरकार राज्यातील यंत्रणा सक्षम करण्यात कमी पडले असल्यामुळे कदाचित आपलं अपयश झाकण्यासाठी केंद्रावर टीका करत असल्याचे दरेकर म्हणाले. तसेच राज्याला मदत करणे ही केंद्राची जबाबदारी, कर्तव्य आहे त्यामुळे राज्याला माल उपलब्ध करण्यासाठी केंद्राशी समन्वय राज्यसरकारणे साधला पाहिजे असा सल्लाही दरेकर यांनी दिला. यावेळी आमदार बबनराव पाचपुते, शिवाजी कर्डिले, महापौर आदि मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत, नातेवाईकांना रेमडेसेवीर आणायला सांगू नका, मोठ्या प्रमाणात रुग्णालयाने साठा दिलेला आहे.

नातेवाईकांना सूचना दिले असताना, रुग्णालयातील रेमडेसेवीर जात कुठे आहे यांचा प्रश्न पडत असताना काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून रुग्णालयातून रेमडेसेवीर उपलब्ध करून घ्यावे असे सांगितले आहे.

No comments:

Post a Comment