गुंडेगावाच्या विलगीकरण कक्षाला अत्यावश्यक औषधांची मदत... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 6, 2021

गुंडेगावाच्या विलगीकरण कक्षाला अत्यावश्यक औषधांची मदत...

 गुंडेगावाच्या विलगीकरण कक्षाला  अत्यावश्यक औषधांची मदत...

स्वाभिमान प्रतिष्ठान कासार मळा ( गुंडेगाव) कौतुकास्पद उपक्रम ...



नगरी दवंडी

गुंडेगाव प्रतिनिधी:- नगर तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेता  गुंडेगाव येथे सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाला स्वाभिमानी प्रतिष्ठान कासार मळा चे सचिव श्री.मेजर शामराव कासार यांच्या हस्ते मोठ्या प्रमाणात  अत्यावश्यक औषधे  गुंडेगावचे उपसंरपच संतोष भापकर, सा.कार्यकर्ते संतोष सकट, आरोग्य सेवक डॉ विलास दाताळ यांच्याकडे सुपूर्द केली.

      कोरानाच्या संकटात अनेक संस्था मद्दतीसाठी पुढे सरसावले आसून गुंडेगाव येथील स्वाभिमानी प्रतिष्ठान कासार मळा चे अध्यक्ष श्री.संतोष भाऊसाहेब कासार ,उपाध्यक्ष निलेश गोरख कासार याच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात औषधे भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे व भविष्यात कोरोना मुक्त गाव  करण्यासाठी योग्य मदत प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येईल आसे मत सचिव मेजर शामराव कासार यांनी व्यक्त केले आहे.

    यावेळी गुंडेगावचे उपसंरपच संतोष भापकर, ग्रामसेवक राठोड भाऊसाहेब, डॉ.विलास दाताळ,  सा.कार्यकर्ते संतोष सकट, माजी उपसंरपच मंगेश हराळ, उद्योगजक संजय भापकर, ग्रा.सदस्य सतिश चौधरी, दादासाहेब आगळे, गणेश जाधव,पत्रकार संजय भापकर, संतोष ससाणे अदि उपस्थितीत होते.

No comments:

Post a Comment