मनपा आरोग्य समिती व केमिस्ट असोसिएशनचे संयुक्त बैठक संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 24, 2021

मनपा आरोग्य समिती व केमिस्ट असोसिएशनचे संयुक्त बैठक संपन्न

 मनपा आरोग्य समिती व केमिस्ट असोसिएशनचे संयुक्त बैठक संपन्न

केमिस्ट सदस्यांच्या लसीकरणासाठी प्रयत्नशील- डॉ.सागर बोरुडे



नगरी दवंडी

अहमदनगर प्रतिनिधी- केमिस्ट असोसिएशने कोरोना संकट काळामध्ये आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडली या संकट काळामध्ये कोरोना रुग्णांना औषध उपलब्ध करून देण्याची जबाबदारी यशस्वीरीत्या त्यांनी पार पाडली. यापुढील काळातही गोरगरीब रुग्णांना कोविड काळात औषधांमध्ये सूट द्यावी, केमिस्ट असोसिएशनचे प्रश्न सोडविण्यासाठी मनपा आरोग्य समिती कटीबद्ध आहे. लवकरच केमिस्ट असोसिएशन सदस्यांच्या लसीकरणासाठी मनपा आयुक्तांशी चर्चा करून लसीकरणाचा प्रश्न मार्गी लावू केमिस्ट असोसिएशनचे सदस्य कोविड काळामध्ये औषधांचा साठा उपलब्ध करून कोरोणा रुग्णांची सेवाच करत आहे. त्यांचे कार्य कोविड योद्ध्या सारखे असल्याचे प्रतिपादन मनपा आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ.सागर बोरुडे यांनी व्यक्त केले.

         मनपा आरोग्य समिती व केमिस्ट असोसिएशनचे कोविड संकट काळातील आरोग्याचे प्रश्‍न सोडविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ.सागर बोरुडे, सदस्य निखिल वारे,सदस्य सचिन जाधव, सदस्य विपुल शेठिया,सदस्य सतिष शिंदे, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर, जिल्हा सचिव राजेंद्र बलदोटा,अशोक बलदोटा,मनीष सोमानी, प्रणित अनमल, विशाल शेट्टी, महेश रच्चा आदी उपस्थित होते.

         यावेळी बोलतांना दत्ता गाडळकर म्हणाले की,केमिस्ट असोसिएशनचे सदस्य प्रत्यक्षरीत्या फिल्डवर्क करत आहे. काम करत असताना अनेक केमिस्ट सदस्यांना कोरोना संसर्ग विषाणूची लागण झाली  तर दुर्दैवाने काही सदस्यांचा यामध्ये मृत्यूदेखील झाला, यासाठी महापालिकेने केमिस्ट सदस्यांसाठी स्वतंत्र असे लसीकरण केंद्र उभारावे, आज केमिस्ट असोसिएशनच्या वतीने घशाची तपासणी(RTPCR) करण्यात आली असून सुमारे 800 सदस्यांची तपासणी या मध्ये केली आहे. केमिस्ट असोसिएशन नेहमीच आरोग्य सेवेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम करत असते असे ते म्हणाले.

      यावेळी राजेंद्र बलदोटा यांनी सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment