ऋतिका वर्पे हीच्या ऑपरेशनसाठी शिवसेना नगरसेवक आले धावून - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 17, 2021

ऋतिका वर्पे हीच्या ऑपरेशनसाठी शिवसेना नगरसेवक आले धावून

 ऋतिका वर्पे हीच्या ऑपरेशनसाठी शिवसेना नगरसेवक आले धावून


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः हालाखाची परिस्थिती आणि त्यात मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारा मोठा खर्च. अशा मोठ्या अडचणीत सापडलेल्या वर्पे परिवाराच्या मदतीला शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम,  नगरसेवक दत्ता कावरे, माजी नगरसेवक आसाराम कावरे हे धावून आले आणि पाहता पाहता दोन लाखांची मदत वर्पे परिवाराला मिळवून दिली.
माळीवाडा येथील रहिवासी ऋतिका उत्तम वर्पे हीस डोके दुखीच्या त्रासामुळे  दवाखान्यात अ‍ॅडमिट केले असता मेंदूवर शास्त्रक्रिया करणे आवश्यक होते. वर्पे परिवाराने मोठ्या कष्टाने पैसांची जमवा जमव करुन  मेंदूचे एक ऑपरेशन केले परंतु दुसर्या ऑपरेशन करणे आवश्यक असल्याने त्यासाठी मोठा खर्च डॉक्टरांनी सांगितला. वर्पे परिवाराची परस्थिती जेमतेम असल्याने दुसर्या ऑपरेशनसाठी पैसे जमविणे अवघड झाले होते. ही गोष्ट शिवसेनेचे माजी शहरप्रमुख  संभाजी कदम व दत्ता कावरे यांना समाजल्यानंतर त्यांनी वर्पे कुटूंबियांची भेट घेऊन धीर दिला पैशांची व्यवस्था करण्याचे आवश्वासन दिले. याबाबत एकत्रित चर्चा करुन याबाबत संबंधितांना माहिती  दिली. यानंतर शिवसेना नगरसेवकांनी मदतीचा हात पुढे करत सुमारे 2 लाख 8 हजार रुपये जमा करत हा मदतीचा धनादेश वर्पे परिवाराकडे सुपूर्द केला.

No comments:

Post a Comment