पारगाव (भातोडी) येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 6, 2021

पारगाव (भातोडी) येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण

 पारगाव (भातोडी) येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरणनगरी दवंडी

चिचोंडी पाटील ( वार्ताहर ) नगर तालुक्यातील पारगाव (भातोडी) येथे पंचायत समिती नगर च्या सभापती सुरेखाताई संदीप गुंड यांच्या प्रयत्नाने व शिवसेना नेते संदीप गुंड यांच्या नियोजनातून लसीकरण कॅम्प घेण्यात आला. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे उद्घाटन शिवसेना नेते संदीपजी गुंड यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनासाठी पंचायत समिती सभापती सुरेखाताई संदीप गुंड व उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे हजेरी लावली. गावातील नागरिकांनी लसीकरण झाल्याबद्दल त्यांचे आभार मानले.           लसीकरणाचा कॅम्प यशस्वी होण्यासाठी सरपंच सौ.मीनाक्षी संतोष शिंदे,युवा व्याख्याते गणेश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य गणेश गुंड, महेश शिंदे, प्रसाद पवार, रविंद्र चव्हाण, संभाजी शिंदे, आरोग्य उपकेंद्राच्या दातीर मॅडम, जाधव मॅडम,डॉ. डमाळे, अंगणवाडी सेविका कालींदा शिंदे, रेखा गुंड, आशा सेविका सपना होनावळे आदींनी प्रयत्न केले. पारगाव (भातोडी) येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण कॅम्प घेतल्याने पंचायत समितीच्या सभापती सुरेखाताई गुंड व शिवसेना नेते संदीप गुंड यांचे ग्रामस्थांकडून तसेच लसीकरणाचे लाभार्थीकडून आभार मानण्यात आले.

No comments:

Post a Comment