रेमडीसीविरच्या काळ्या बाजाराची सखोल चौकशी करा ः माळवदे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, May 20, 2021

रेमडीसीविरच्या काळ्या बाजाराची सखोल चौकशी करा ः माळवदे

 रेमडीसीविरच्या काळ्या बाजाराची  सखोल चौकशी करा ः माळवदे

नेवासा काँग्रेसचे गृहमंत्री, आरोग्य मंत्री, अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांकडे मागणी
चौकट :- राज्यात महाविकास आघाडी सरकार कोविडं परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळत असताना रेमडीसीविरचा काळा बाजार करणारे दलाल, यात सहभागी डॉक्टर, अधिकारी , कोविडं संचालक, यामुळे सरकारची बदनामी होतं असुन, वडाळा येथील प्रकरण गंभीर असून याची गुप्तचर विभागामार्फत चौकशी होणे आवश्यक आहे .. यासाठी सर्वोतोपरी  प्रयत्न करणार व  जनतेला न्याय मिळवून देणार.
- संभाजी माळवदे - अध्यक्ष नेवासा तालुका काँग्रेस कमिटी

नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः अहमदनगर गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने सापळा रचून, छापा टाकून दिनांक 09/05/2021 रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान वडाळा बहिरोबा ता, नेवासा येथे रेमडीसीविर इंजेक्शन चा काळा बाजार करणार्‍या चौघांना अटक केली तसेच यातील एकजण फरार झाला, यावेळी सहा रेमडीसीविर इंजेक्शन सह लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला, या टोळीवर अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक अशोक राठोड यांनी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा देखिल नोंदविला.
रेमडीसीविर सध्या शासकीय नियंत्रणात असताना या लोकांकडे काळ्या बाजारात विकण्यासाठी आले कुठून याची चौकशी होणे गरजेचे होते, या टोळीचा खाजगी कोविड रुग्णालयातील डॉक्टर , कोविड सेंटर मधील मेडिकल चालक तसेच शासकीय अधिकारी यांच्याशी संबंध असल्याची चर्चा सगळीकडे होताना दिसत आहे.
याशिवाय शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याकडे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा वर्ग झालेला असताना त्यांच्याकडून देखिल तपास अत्यंत संथ गतीने सुरु असल्याचा आरोप केला जात आहे.
वडाळा येथे सुरु केलेल्या कोविडं सेंटरवर ग्रामपंचायततीने देखिल हरकत घेतली आहे , विना परवाना सेंटर सुरु करणे, कचर्‍याची विल्हेवाट न लावणे याबाबत कारणे दाखवा  नोटीस देखिल बजावली आहे.सदर प्रकरणाची नेवासा काँग्रेसने दखल घेऊन या प्रकरणी राज्याचे  मा.गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री मा.राजेश टोपे साहेब , अन्न व औषध प्रशासन मंत्री, मा.  राजेंद्र शिंगणे साहेब  याना निवेदन देऊन सदर प्रकरणांची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करून सामान्य माणसाला न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संभाजी माळवदे ,एससी विभाग जिल्हाकार्यध्यक्ष कमलेश गायकवाड,  संघटक संदीप मोटे,  उपाध्यक्ष सुनील भोंगे, सरचिटणीस प्रवीण तिरोडकर, सचिन बोर्डे, आदींसह कमिटी सदस्यांनी हस्ताक्षर केले आहे..

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here