भाळवणीच्या कोव्हिड सेंटरलाना.मुश्रीफांची २ लाख रुपयांची मदत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 26, 2021

भाळवणीच्या कोव्हिड सेंटरलाना.मुश्रीफांची २ लाख रुपयांची मदत

 कोरोना काळात ‌आमदार निलेश लंकेसारखा लोकप्रतिनिधीचे काम देशाला व महाराष्ट्राला आदर्श  ग्रामविकास मंत्री ना हसन मुश्रीफ

कोव्हिड सेंटरला ना.मुश्रीफांची २ लाख रुपयांची मदत

भाळवणीच्या कोव्हिड सेंटरला ना.मुश्रीफांची भेट



नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

कोरोनाच्या महामारीच्या काळात लोकांच्या कल्याणासाठी जीवावर उदार होऊन आमदार निलेश लंके सारखा लोकप्रतिनिधी काय काम करू शकतो हे देशाला व महाराष्ट्रातला दाखवून दिले आहे. याचा मला हे व पक्षाला अभिमान असल्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे.त्यामुळे नगर जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आमदार निलेश लंके या माझा एक शिष्यचा अभिमान मला व पक्षाला अभिमान असल्याचे ग्रामविकास मंत्री व पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी गौरवोद्गार काढले आहे.तर पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी आमदार निलेश लंके यांच्या 

शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरास २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.ग्रामविकास मंत्री व पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी बुधवारी सकाळी शरदचंद्र पवार महाकोव्हिड सेंटर भेट दिली.यावेळी आमदार निलेश लंके जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले प्रांताधिकारी सुधाकर भोसले तहसीलदार ज्योती देवरे जि.प.चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे सरपंच राहुल झावरे जितेश सरडे पैलवान सुरज भुजबळ संतोष भुजबळ  गटविकास अधिकारी किशोर माने आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश लाळगे डॉ बाळासाहेब कावरे डॉ मानसी मानोरकर अशोक सावंत दिपक लंके‌ बापूसाहेब शिर्के बाळासाहेब खिलारी श्रीकांत चौरे अनिल गंधाक्ते अभयसिंह नांगरे पैलवान प्रमोद गोडसे दत्ता भाऊ कोरडे मुकुंद शिंदे नितीन मुरकुटे संदिप चौधरी सरपंच सचिन पठारे बाळासाहेब लंके  याांच्या सह‌ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पारनेर तालुका पदाधिकारी तसेच निलेश लंके प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ आमदार निलेश लंके या कोव्हिड सेंटरच्या माध्यमातून निरपेक्ष भावनेने मदत करत आहे.उद्घाटनाला मी येणार होतो परंतु कौटुंबिक अडचणी मुळे येवु शकलो नाही. ७ हजार पेक्षा जास्त लोकांनी या कोव्हिड सेंटर चा लाभ घेतला आहे.लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे व दिलासा देणे हाच रामबाण उपाय या आजारावरील‌ आहे.जिल्हातील सर्व वैद्यकीय अधिकारी व प्रशासनाच्या वतीने चांगली सेवा केली आहे.कोरोनात लवकरात लवकर बरे होवुन आपापली कामे करण्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन पण केले आहे.कुटुंबची कुटुंब या लाटेत बसली आहे कारण भारत देश या आजारांमध्ये मृत्यूचा दर तिसरा क्रमांकावर आहे.त्यामुळे किमान मास्क‌ सॅनिटायझर व सामाजिक अंतर पाळले पाहिजे. त्यामुळे तिसरा लाटेला सरकार व प्रशासनाच्या वतीने तयारी केली आहे.या तिसरा लाटेत शिर्डी व नगर लोकांची सोय करणार असल्याचे नामदार मुश्रीफ यांनी सांगितले आहे.हवेतुन आॅक्सिजन निर्मितीसाठी प्रयत्न करणार आहोत.केंद्र सरकारच्या निती आयोगाने व प्रंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र राज्य सरकार ‌वर कौतुक केले आहे.म्युकर मायकोसिस बाबत प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करण्यात येणार आहे.त्यामुळे बाहेरील राज्याची परिस्थिती गंभीर बनली आहे. महाराष्ट्र राज्यातील ८० टक्के लसीकरण पुर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेला आहे. 

यावेळी आमदार निलेश लंके म्हणाले की या कोव्हिड सेंटर १८० गंभीर रुग्णांना उपचारासाठी बाहेर पाठविले आहे.नगर जिल्हा तील नव्हे तर महाराष्ट्रातील ईतर जिल्ह्यातील लोकांनी या उपचारासाठी दाखल केले आहे.२३ स्कोरवाले आवाहनात्मक रूग्ण या कोव्हिड सेंटर बरे केले आहे.३७० लोकांना रेमडेसेव्हर इंजेक्शन वापर केला आहे.या कोव्हिड सेंटर मध्ये खाजगी डाॅक्टरांची मदत घेवून नवनवीन उपचार पद्धती वापर केला आहे.ज्या लोकांचा यामतदारसंघाचा संबंध नाही त्या लोकांनी मदत दिली आहे.

यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले म्हणाले की ७२०० लैकांना लाभ मिळाला असून १२००लोकांना आॅक्सिजन लाभ या कोव्हिड सेंटर मधील रुग्णांना आधार मिळाला आहे.त्यामुळे मास्क व सोशल डिस्टंन्सचा वापर करावा असे आवाहन केले आहे.बराचशा प्रलंबित योजना पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी जाहिर केले आहे.



 कोव्हिड सेंटर हेच महिन्याभरा पासून घरदार. आमदार निलेश लंके 

कोरोनाच्या काळात अनेक कुटुंबांना जगण्याचा प्रश्न निर्माण झाला असून गोरगरीब व गरजु कुटुंबीयांना कोरोना काळात ‌कोव्हिड सेंटरच्या माध्यमातून  मदतीचा हात दिला आहे.त्यामुळे‌ उपचारासाठी रूग्णांना मानसिक आधार देण्यासाठी कोव्हिड सेंटर हेच आमचे‌ हेच आमचे‌ घरदार..ही जनता आमची मायबाप आहे.. आम्ही आमची काळजी करत घरात बसलो असतो या जनतेची काळजी कोणी घेतली असती हा फार मोठा प्रश्न आहे.त्यामुळे ज्या जनतेने माझ्यावर विश्वास टाकला आहे तो एक जनसेवक म्हणू

No comments:

Post a Comment