विडीकामगारांना आर्थिक सहाय्य न मिळाल्यास राज्यभर आंदोलन करणार– नरेश कोटा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 8, 2021

विडीकामगारांना आर्थिक सहाय्य न मिळाल्यास राज्यभर आंदोलन करणार– नरेश कोटा

 आमरण उपोषण ५ व्या दिवशी स्थगित.

विडीकामगारांना आर्थिक सहाय्य न मिळाल्यास राज्यभर आंदोलन करणार– नरेश कोटा



नगरी दवंडी

नगर – विडी कामगार सुद्धा घरी बसून विडी वळण्याचे काम करतात, लॉकडाऊनमुळे मागील वर्षापासून कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली आहे. घरेलू कामगार म्हणून विडीकामगार कुटुंबांना सरकारी आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी केलेले उपोषण कामगार आयुक्त व पोलिस खात्याच्या विनंतीवरून स्थगित करीत आहे. मात्र मुख्यमंत्री साहेबांनी आर्थिक मदत लवकरात लवकर जाहीर करावे अन्यथा राज्यभरातील विडी कामगार ठीक ठीकांनी आंदोलन करतील असा इशारा स्त्री जन्माचे स्वागत उपक्रमाचे अध्यक्ष नरेश कोटा यांनी दिला. 

       विडीकामगारांना आर्थिक सहाय मिळावे म्हणून नरेश कोटा यांनी आपल्या घरातील गच्चीवर आमरण उपोषण सुरु केले होते. कामगार आयुक्त यांनी सर्व माहिती मुख्यमंत्री कार्यालयास दिली व पोलिसांनी कोविड काळाचा विचार करून उपोषण स्थगित करण्याची विनंती केल्याने नगरसेवक मनोजभाऊ दुलम, पाइपलाईन रोड वस्तीस्तर संघाच्या अध्यक्षा विद्याताई एक्कलदेवी यांच्या उपस्थितीत व तोफखाना पोलीस स्टेशनचे एपीआय किरण सुरसे यांच्या हस्ते लिंबूपाणी घेवून उपोषण स्थगित करण्यात आले. 

        या वेळी बोलतांना नगरसेवक मनोज दुलम म्हणाले की, विडी कामगारांची आर्थिक परस्थिती दिवसेंदिवस हालाकीची होत चालली आहे म्हणून नरेश कोटा यांनी केलेले उपोषण समर्थनीय आहे या उपोषणाला माझा सक्रीय पाठींबा होता. सरकारने या उपोषणाची दखल घेवून विडीकामगारांना आर्थिक मदत त्वरित करावी. अशी मागणी केली.

      पाइपलाईन रोड वस्तीस्तर संघाच्या अध्यक्षा विद्याताई एक्कलदेवी म्हणाल्या गेल्या वर्षापासून लॉकडाऊन होत असल्याने विडीकाम  करणारऱ्या कामगारांच्या हाती पैसे नाहीत, अनेकांना अनेक अडचणी आहेत,  दवाखाना, घरभाडे, घरखर्च असे अनेक गोष्ठीमुळे सद्या हालाखीची परस्थिती निर्माण झाली असल्याने त्यांना आर्थिक सहाय्याची गरज आहे ते सरकारने दिले पाहिजे.

      नरेश कोटा यांच्या उपोषणास राज्यभरातील संस्था, संघटना, मान्यवर लोकांनी पाठींबा दिला आहे. नगर शहरात पाइपलाईन रोड वस्तीस्तर संघाच्या रेखाताई दुलम, वंदनाताई दडगे, कल्पनाताई बुलबुले, नगर विडी कामगार संघटनाचे नगरसेवक विनीत नाथ पाऊलबुद्धे, उपाध्यक्ष, विनायक विश्वनाथ मच्चा, भारतीय काम्युनिष्ठ पक्ष राज्य सह सेक्रेटरी कॉ सुभाष लांडे, लाल बावटा विडीकामगार संघटना आयटक जनरल सेक्रेटरी अॅड सुधीर टोकेकर, उपाध्यक्ष भारती न्याल्पेल्ली, उर्जिता फाउंडेशनच्या अध्यक्षा संध्याताई मेढे, साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान, नगरसवेक सुनील त्र्यंबके, योगेश पिंपळे, माजी नगरसेवक वीणाताई बोज्जा,श्रीनिवास बोज्जा, नगरसेवक श्याम नळकांडे, बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज असोसिएशनचे नेते प्रकाश कोटा, नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, पद्मशाली युवाशक्ती, साई सम्राट मित्र मंडळ, श्रमिक बालाजी सामाजिक संस्थाचे अध्यक्ष विनोद म्याना, पद्मकन्या पुरस्कार समितीचे तिरमलेश पासकंटी, महापद्मसेनाचे रवी दंडी,संकट मोचन हनुमान मंदिर ट्रस्ट, अध्यक्ष भूमया येमूल, पद्मशाली सोशल फाउंडेशन अध्यक्ष रोहित गुंडू श्रीनिवास बुरगुल आदींनी कोटा यांना पत्र  देवून पाठींबा दिला व  मुख्यमंत्री यांनाही पत्र पाठवून दिले आहेत..

No comments:

Post a Comment