सोलर पथदिवेही काळाची गरज ः आ. संग्राम जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 31, 2021

सोलर पथदिवेही काळाची गरज ः आ. संग्राम जगताप

सोलर पथदिवेही काळाची गरज ः आ. संग्राम जगताप 

सचिन जाधव यांच्या प्रयत्नातून जलालशाह व तंबोली कब्रस्तान येथे सोलर पथदिव्याचे उद्घाटन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सोलर पथदिव्यांच्या माध्यमातून विजेची बचत होवून आर्थिक फायदा होण्यास मदत होते. केंद्र व राज्य सरकार सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यासाठी निधी उपलब्ध करून देत आहे, सौर ऊर्जेमुळे दिवसभर वीज निर्मिती होऊन रात्री हे पथदिवे प्रकाशमय होतात, शहरांमध्ये ठीक ठिकाणी सौर पथदिवे बसविण्याच्या संकल्प आहे. जलालशाह व तंबोली कब्रस्तान येथे लाईट नसल्यामुळे दफनविधीसाठी मोठी अडचण निर्माण होत होती. यासाठी मा. स्थायी समिती सभापती सचिन जाधव व राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे साहेबांन जाहगीरदार यांच्या प्रयत्नातून सोलर पथदिवे बसविण्यात आले आहेत भविष्य काळामध्ये सोलर पथदिवे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
मा. स्थायी समितीचे सभापती सचिन जाधव यांच्या माध्यमातून व राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष साहेबांन जाहगीरदार यांच्या प्रयत्नातून जलालशाह व तंबोली कब्रस्तान येथे सोलर पथदिव्यांचा लोकार्पण सोहळा आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी अब्दुल सलाम, मुजाहिद कुरेशी, वाहिद हुंडेकरी, पै. जिशन शेख, रउफ हाजी, अकिल हाजी, अब्दुल खोकर, शाहनवाज शेख, शाहरुख शेख, वसीम शेख आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मौलाना अब्दुल सलाम म्हणले की, जलालशाह व तंबोली कब्रस्तान येथे रात्रीच्या वेळी लाईटचे सुविधा नसल्यामुळे दफनविधी करताना मोठी अडचण निर्माण होत होती सदर प्रकार मा.नगरसेवक सचिन जाधव व साहेबाना जहगीरदार यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी ताबडतोब आ. संग्राम जगताप यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावला. आ.संग्राम जगताप हे शहर विकासाचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवत आहे, समाजहिताचे कुठलेही काम सांगितल्यानंतर ते ताबडतोब सोडवण्यास आ.जगताप प्राधान्य देत असतात असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment